रुग्ण सेवा हीच ईशवर सेवा : अजित पवार

उदघाटन प्रसंगी अजित पवार व डॉ अमित भापकर,डॉ राधेय खलाटे, विशाल साळवे व इतर

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती प्रतिनिधी):-


बारामती मेडिकल हब होत असताना बारामतीच्या आसपासच्या जिल्ह्यातील व तालुक्यातील अनेक रुग्ण व स्थानिक रुग्ण यांना उत्कृष्ट सेवा मिळावी व रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून वैद्यकीय क्षेत्राने काम करावे अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
बारामती एमआयडीसी येथील डॉ अमित भापकर यांच्या स्वयंभू हॉस्पिटल च्या अंतर्गत असलेल्या माऊली मेडिकल व विघ्नहर्ता लॅब चा उद्घाटन समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते रविवार २२ डिसेंबर रोजी संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे,डॉ राधेय खलाटे,माळेगाव चे चेअरमन ऍड. केशव जगताप ,डॉ रेश्मा भापकर, विशाल साळवे व सुयश ऑटो चे कामगार नेते भारत जाधव, विवेक टेंगले आदी मान्यवर उपस्तीत होते.
गुणवत्तापूर्ण व दर्जात्मक,सकारत्मक सेवा दिल्याने रुग्ण लवकर बरा होतो एकाच छताखाली सर्वकाही सुविधा रुग्णांना दिल्यामुळे वेळ आणि पैसा वाचतो त्यामुळे मेडिकल स्टोअर्स व लॅब सुरू केल्याचे डॉ अमित भापकर यांनी सांगितले.
स्वागत विशाल साळवे व विवेक टेंगले यांनी केले तर सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले व आभार डॉ राधेय खलाटे यांनी मानले

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!