फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण ०३):-
यशवंतराव आणि वेणूताई चव्हाण हायस्कूल, फलटण येथे १० जानेवारी रोजी आयोजित होणारा “एअर गुरुजी” विज्ञान आणि तंत्रज्ञान महोत्सव आणि एक्स्पो हा एक अद्वितीय अनुभव देणारा ठरेल. या महोत्सवात १००+ शालेय विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचे प्रात्यक्षिक पाहता येईल, ज्यामध्ये स्मार्ट सिस्टीम्स, ड्रोन, स्मार्ट सिटी, रोव्हर, रोबोट्स आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा समावेश आहे. तसेच आम्ही अधिकाधिक शालेय विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहोत.
या महोत्सवात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अभिनव प्रकल्पांचे प्रदर्शन होईल, तसेच ड्रोन आणि विमान शो देखील आयोजित केला जाईल, ज्याचा आनंद विद्यार्थ्यांसह पालकांनीही घ्यावा. महोत्सव सकाळी १० वाजता सुरु होईल आणि दुपारी ४ वाजेपर्यंत चालेल.
तुम्ही यामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांची क्रिएटिविटी आणि कल्पकता अनुभवू शकता. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक पारितोषिके, प्रमाणपत्रे आणि ट्रॉफींचे वितरण केले जाईल.
तारीख: १० जानेवारी २०२५
वेळ: सकाळी१० :०० – दुपारी ०४:००
स्थळ: यशवंतराव आणि वेणूताई चव्हाण हायस्कूल, फलटण
“एयर गुरुजी इंटरनॅशनल” महोत्सव हे फक्त स्थानिकच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण विचारांना वाव देणारे एक महत्त्वपूर्ण मंच आहे. हे महोत्सव पाहण्यासाठी नक्की भेट द्या आणि विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानातील क्रांतीला प्रोत्साहन द्या!असे आवाहन यावेळी आयोजकाकडून करण्यात आले आहे