क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या “जयंती” निमित्ताने आपले विचार मांडताना श्री नितीन जगताप व उपस्थित विद्यार्थी वर्ग
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण ०३):-
०३ जानेवारी…महिला मुक्ती दिन…क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची “जयंती” यानिमित्ताने शुक्रवार ०३ जानेवारी 2025 रोजी मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विविध उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाचे आयोजन माध्यमिक व ज्युनियर विभागातील सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात आले होते.
यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक मा.श्री नितीन जगताप सर, ज्युनिअर विभागाचे मा.श्री सोमनाथ माने सर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. जयंती निमित्त प्रशालेत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेत इयत्ता ५ वी ते ११ वि च्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सावित्रीबाईं फुले यांच्या जीवनावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले .
तसेच यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री नितीन जगताप सर यांनी यांनी सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक योगदान, सामाजिक क्रांतीतील महत्त्व आणि म. फुले यांच्या तीन पत्रातील मजकूर आणि त्यांच्या कार्याची माहिती सांगितली तसेच स्त्रीसक्षमीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांवर सखोल व्याख्यान दिले. त्यांनी सावित्रीबाईंच्या विचारांची आजच्या काळातील महत्त्वपूर्ण आवश्यकता स्पष्ट केली.सावित्रीबाईं फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य मनोगतातुन व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व सावित्रीच्या लेकी , शिक्षिका यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळेस सकाळ विभागातील ज्युनियर कॉलेज व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षिका वृंद उपस्थित होते….या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पवार, कु तृप्ती शिंदे व कु संगीता कदम यांनी केले तर यावेळी आभार सुधाकर वाकुडकर यांनी मानले.