श्रीराम कारखाना देणार३,१०० रुपये प्रति टन

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. ८ ): –
श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना व जवाहर संस्थेने या वर्षीच्या गाळप हंगामात श्रीराम सहकारी साखर कारखान्याकडे गाळपास आलेल्या उसाला प्रति टन ३,१०० रुपये उचल देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती श्रीरामचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

श्रीराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ आणि जवाहर भागीदारी संस्थेच्या सभेत माजी विधानपरिषद सभापती तथा विधानपरिषद विधामन आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे मार्गदर्शनानुसार हा निर्णय घेण्यात आले असून एफआरपीच्या सूत्रानुसार कारखान्याची एफआरपी प्रतिटन २ हजार ८२२ रुपये ५० पैसे इतकी आहे, तथापि प्रति टन २७७ रुपये ५० पैसे जादा अदा करणेत येत असल्याचे श्रीरामचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी पत्रकात नमूद केले आहे.

सन २०२४ -२५ या चालू गळीत हंगामामध्ये गाळप झालेल्या उसाला प्रति टन ३,१०० रुपये उचल जाहीर केली असल्याची माहिती या पत्रकाद्वारे देताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस श्रीराम सहकारी साखर कारखाना व जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योगाकडे गळितास पाठवावा असे आवाहन श्रीरामचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी ऊस उत्पादकांना केले आहे.

ऊस दराबाबत निर्णय झाल्यानुसार सन २०२४-२५ या गाळप हंगामामध्ये दि. १५ ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत श्रीराम सहकारी साखर कारखान्याकडे गाळपास आलेल्या ६३
हजार ५९३.३८५ मे. टन उसास प्रति मे. टन ३,१०० रुपये प्रमाणे होणारे एकूण रक्कम १९ कोटी ७१ लाख ३९ हजार ४९३ रुपये पेमेंट आज मंगळवार, दि. ७ जानेवारी २०२५ रोजी ऊस उत्पादक यांचे बँक खात्या खात्यावर जमा करण्यात आले असल्याचे या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!