फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा, दि. 8 ): –
तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात, शिक्षण संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभासाठी 15 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले.
तालुकास्तरीय 2024-2025 या वर्षातील नव्याने प्रवेशित व मागील वर्षी स्वाधार योजनेसाठी अर्ज केलेल्या रिनिवल विद्यार्थ्यांनीसुद्धा स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी 15 जानेवारी पर्यंत https://hmas.mahait.orgऑनलाईन अर्ज करावेत. सर्व कागदपत्रासंह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुक्यातील मुला, मुलींचे शासकीय विश्रामगृह येथे सादर करावेत.