फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि.१०):-
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण तर्फे श्रीमंत मालोजीराजे कृषि प्रदर्शन 2025 चे यशस्वी आयोजन केल्या बद्दल दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचा सत्कार मौजे चौधरवाडी तर्फे करण्यात आला. सदरील कृषि प्रदर्शनाचे आयोजन 2 जानेवारी ते 6 जानेवारी 2025 दरम्यान श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुलातील प्रांगणात करण्यात आले होते. श्रीमंत मालोजीराजे कृषि प्रदर्शन 2025 चे उद्घाटन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटिल व अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी विधान परिषद सभापती मा. आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा तथा सेक्रेटरी, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण मा. श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. सदरील कृषि प्रदर्शनामध्ये विविध कृषि संबधित कंपन्या, शेती व्यवसायाला लागणाऱ्या कृषि निविष्ठा, शेती यांत्रिकीकरण, महिला बचत गट उद्योग, गांडूळखत निर्मिती, हातमाग व घर उद्योग, चर्मकार उद्योग, लोणचे व्यवसाय, विविध कुटिर उद्योग व कृषि विषयक विविध चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कृषि प्रदर्शनात फलटण तालुक्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर, शेती यंत्र व अवजारे, मोटार गाड्या, शेती तंत्र यांची बहुसंख्य प्रमाणात शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्यांनी विक्री करण्यात आली. प्रदर्शनाच्या अखेर पर्यंत फलटण तालुक्यातील व पंचक्रोशीतील 80,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कृषि प्रदर्शनाला भेट दिली व श्रीमंत मालोजीराजे कृषि प्रदर्शन 2025 हे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचे विशेष आकर्षण ठरले. सत्कार प्रसंगी मौजे ग्रामपंचायत चौधरवाडीचे श्री. मुकुंदराव धनवडे, श्री. बुवासहेब गुंजवटे, श्री. बबनराव रणवरे श्री. योगेश भोसले, श्री. प्रमोद भोसले, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. सदरील सत्कारा प्रसंगी दोन्ही महाविद्यालयाच्या प्राचार्य तर्फे प्रा. ए. डी. पाटील यांनी मौजे चौधरवाडी ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त केले. शब्द संकलन व शब्दांकन – प्रा. एन. एस. धालपे आणि डॉ. जी. बी. अडसूळ यांनी केले.