आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व पुरस्कार स्वीकारताना अशोक करगे व इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि .११):-
फलटण येथील अनुबंध कला मंडळ, फलटणयांच्या वतीने कामगार दिनाचे औचित्य साधून फलटण परिसरात अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या विविध क्षेत्रातील कामगारांना दिला जाणारा २०२४ -२५ या वर्षातील पुरस्काराचे वितरण शनिवार, दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी डॉ.प्रसाद जोशी हॉस्पिटल फलटण येथील सभागृहात संपन्न झाला .
यावेळी मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे सेवक श्री. अशोक करगे यांनी गेली ५२ वर्षे सेवक म्हणून प्रामाणिक अखंडीत कर्तव्यपर सेवा बजावल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा विधान परिषदे चे विधमान सदस्य आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते फलटण येथील अनुबंध कला मंडळ यांच्या वतीने दिला जाणाऱ्या “सन्मान अथक परिश्रमाचा” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून फलटण नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर , जेष्ठ पत्रकार श्री अरविंदभाई मेहता ,साहित्यिक श्री बकुळ पराडकर ,माजी प्राचार्य रविंद्र येवले ,श्री विजयराव नेवासे , डॉ. श्रीकांत करवा , श्री विजय जाधव , सौ सुपर्णाताई अहिवळे, अनुबंध कला मंडळचे सदस्य व सन्मानार्थी आणि अनेक मान्यवर उपस्थिती होते.
या सन्मानाबद्दल माजी आमदार श्री दीपकराव चव्हाण , फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती मा श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी चे प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम, तपासणी अधिकारी श्री दिलीप राजगुडा , मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री सुधीर अहिवाळे, माध्यमिकचे उपप्राचार्य श्री नितीन जगताप , ज्युनियर कॉलेज चे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने ,पर्यवेक्षिका सौ पूजा पाटील व शिक्षकवृंद, सेवक , कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले