उदघाटन प्रसंगी अजित पवार, सुनेत्रा पवार,रणजित पवार व ईरा पवार आणि अन्य मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि १२):-
बारामती मधील खवय्ये यांना मॅकडोनल्डस साठी
पुण्यात जाण्याची गरज नाही अत्याधुनिक बारामती बघून आंतरराष्ट्रीय ब्रँड बारामतीला प्राधान्य देत आहेत,मॅकडोनल्डस म्हणजे खवय्ये साठी भांडार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
रविवार ०५ जानेवारी रोजी बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये ईरा रणजित पवार यांनी सुरू केलेल्या मॅकडोनल्डस या रेस्टॉरंटचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. खासदार सुनेत्रा पवार, रणजित पवार, शुभांगी पवार, ईरा व देवयानी पवार हे पवार कुटुंबीय, मॅकडोनल्डसचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कालरा व संचालक नीतेश पांडे हेही या प्रसंगी उपस्थित होते.
बारामतीचा सर्वांगिण विकास व्हावा या दृष्टिकोनातून सर्व जण टीम वर्क करतो. होणारी वाढ विचारात घेत आंतरराष्ट्रीय ब्रँड बारामतीत येत आहेत, ही बाब समाधानाची आहे. तालुका स्तरावर
मॅकडोनल्ड प्रथमच बारामतीत येत आहे याचे विशेष कौतुक करत हा ब्रँड बारामतीत आणल्याबद्दल ईरा पवार यांचे विशेष अभिनंदन करून
स्वित्झर्लंड येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेल्या देवयानी पवार यांचा अजित पवार यांच्या हस्ते या प्रसंगी सत्कार करण्यात आला. ही संधी मिळालेल्या त्या एकमेव भारतीय आहेत.
अनेकांची मॅकडोनल्ड ही पहिली पसंती असते. त्यामुळे बारामतीच्या वैभवात या नवीन रेस्टॉरंटमुळे भर पडणार आहे.आता मोठ्या शहरात न जाता मॅकडोनल्ड चे खाद्यपदार्थ काही मिनिटात उपलब्ध होणार आहेत त्यामुळे वेळ वाचणार असल्याचे ईरा पवार यांनी सांगितले.