मुधोजी हायस्कूलमधे खगोलशास्त्रीय सप्ताह उस्ताहात संपन्न

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १२):-

दि. ५ ते १२ जानेवारीदरम्यान अंतराळ खगोलशास्त्रीय सप्ताहाचे आयोजन फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण मध्ये केले गेले होते.या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून शाळेमध्ये अंतराळ व खगोलविषयक प्रचार, प्रसाराचे कार्य भौतिकशास्त्राचे विभाग प्रमुख ज्येष्ठ प्राध्यापक श्री. अभिजीत माळवदे व भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक श्री. नार्वेकर सर यांनी जोमाने सुरू केले होते.

यामध्ये मध्ये दररोज संध्याकाळी ७ :०० ते रात्री ०८:३० वाजेपर्यंत गुरू व शुक्र ग्रहांच तसेच चंद्राचे दुर्बिणीतून दर्शन घडवण्यात आले. या कार्यक्रमासाठी ‘Celestron Astro Master १३० या दुर्बिणीचा वापर करण्यात आला. याप्रसंगी कॉलेजचे भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक श्री. नार्वेकर सर यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना दुर्बिणीच्या हाताळण्याविषयी माहिती सांगून, गुरू,शुक्र व चंद्राचे अगदी जवळून दर्शन घडवले. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला.

यादरम्यान दुर्बिणीतून दिसणाऱ्या दृश्यांचे मोबाइलवर फोटो घेण्याचा मोह उपस्थि-तांना आवरता आला नाही. गुरु ग्रहाच्या आजू- बाजूला असणाऱ्या एकूण चार चंद्रांचे दृश्य पाहण्यात यश आले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री सुधीर अहिवळे , ज्युनियर कॉलेज चे उपप्राचार्य श्री. सोमनाथ माने , माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य श्री नितीन जगताप ,पर्यवेक्षिका सौ पूजा पाटील व भौतिकशास्त्राचे विभाग प्रमुख ज्येष्ठ प्राध्यापक श्री. अभिजीत माळवदे यांचे उपस्थिताना मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.

तसेच हा कार्यक्रम यशस्वीपार पडण्यासाठी मुधोजी हायस्कूल व कॉलेजच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!