अत्याधुनिक युगात जात असताना इतिहास विसरता कामा नये: विश्वास पाटील

सरदार जानराव वाबळे शौर्य दिन साजरा करत असताना विश्वास पाटील, प्राजक्ता गायकवाड ,मकरंद अनासपुरे व विक्रमसिंह वाबळे
सरदार जानराव वाबळे पानिपत शौर्य दिन साजरा

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती):-


अत्याधुनिक युगात जात असताना इतिहासाची वैभवशाली परंपरा असणारे वाडे, राजवाडे, गढी पुढील पुढीला दाखवण्यासाठी व इतिहास कळण्यासाठी यांचं संवर्धन आणि जतन होणे ही काळाची गरज असल्याचे मत इतिहासकार पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.
मूळचे बारामती तालुक्यातील मूढाळे येथील वाबळे घराणे असून पानिपत मध्ये अतुलनीय शौर्य गाजवणारे सरदार जानराव वाबळे व सहकारी यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी म्हातर पिंप्री (श्रीगोंदा) येथे सरदार जानराव वाबळे यांचे वंशज विक्रम वाबळे यांनी
पानिपत शौर्य दिनाचे १४ जानेवारी मकर संक्रांत रोजी आयोजन करण्यात केले होते. याप्रसंगी विश्वास पाटील बोलत होते.

याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, तांडव नाटकाचे दिग्दर्शक दिलीपराव भोसले, माळेगाव कारखान्याचे चेअरमन केशव जगताप, उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते ,संचालक राजेंद्र ढवाण,व प्रल्हाद वरे,प्रमोद काकडे आदी मान्यवर उपस्तीत होते.
ऐतिहासिक वास्तू ठिकाणी हॉटेल बांधून किंवा वास्तू च्या ठिकाणी उंच इमारत बांधून पैसे कमवण्यापेक्षा पुढील पिढी ला प्रेरणा देण्यासाठी सदर ऐतिहासिक वास्तूचे जतन व्याहवे असे मत अभिनेते मकरंद अनासपुरे व अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी मांडले.
पानिपत ही महाराष्ट्राची शौर्यगाथा असून तालुक्याचा आणि पानिपतचा कनिष्ठ संबंध आहे पानिपतच्या युद्धात पराक्रम गाजवणारे सरदार जानराव वाबळे यांची तालुक्यातील तीन वाड्याची भव्य गडी दुर्लक्षित होती तिची पडझड झाली होती तिला गतवैभव प्राप्त करून दिले असून नवीन पिढीसाठी दिशा दर्शक झाली असल्याचे विक्रम सिंह वाबळे यांनी सांगितले
याप्रसंगी शाहीर राजेंद्र कांबळे आणि सहकाऱ्यांनी सरदार जानराव वाबळे यांच्यावर ऐतिहासिक पोवाडा चे सादरीकरण केलं व सदर इतिहास उलगडणारे प्रा दुधाने यांचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन सावळे पाटील यांनी केले आभार स्मितल वाबळे यांनी मानले

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!