व्हेरिटास ग्रुप च्या वर्धापन प्रसंगी चेअरमन नीलम भापकर व व्यवस्थापकीय संचालक दिलीप भापकर व अन्य
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती):-
व्हेरिटास ग्रुप म्हणजे एक कुटूंब असून अडचणीच्या काळात कर्मचारी व अधिकारी वर्गाने दिलेली समर्थ साथ या मुळे व्हेरिटास ग्रुप ने यश मिळवले आहे आता औद्योगिक बांधकाम क्षेत्रात सुद्धा भरारी घेतली आहे कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेऊन नेहमी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध राहू असे प्रतिपादन व्हेरिटास ग्रुप चे व्यवस्थापकीय संचालक दिलीप भापकर यांनी केले.
व्हेरिटास ग्रुप च्या चौदाव्या वर्धापन दीना निमित्त कर्मचारी अधिकारी यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी दिलीप भापकर बोलत होते या वेळी व्हेरिटास ग्रुप च्या चेअरमन निलम भापकर,व्यवस्थापक महंमद जाफर व अधिकारी, सुपरवायझर ,कामगार आदी उपस्तीत होते
भापकर हे शेतकरी कुटुंबातील असून जिद्द,चिकाटी व आत्मविश्वास च्या जोरावर व्हेरिटास ग्रुप च्या माध्यमातून अनेकांना रोजगार देऊन अनेक संसार उभा केले आणि कोरोनाच्या काळात सुद्धा कामगारांसाठी मानवता भूमिकेतून उल्लेखनीय कार्य केले असल्याचे प्रेरक प्रशिक्षक अनिल सावळेपाटील यांनी सांगितले.व्हेरिटास ग्रुप म्हणजे कुटूंब असून त्यातील, कामगार, अधिकारी, सुपरवायझर व संचालक मंडळ म्हणजे कुटुंबातील सदस्य आहेत, प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्यावी कंपनीची प्रगती म्हणजेच कुटूंबाची प्रगती असल्याचे चेअरमन नीलम भापकर यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांनी शॉप मध्ये अथवा विविध साईटवर काम करताना आरोग्याची व सुरक्षतेची काळजी घेणे महत्वाचे असल्याचे विविध डिपार्टमेंट च्या अधिकाऱ्यानी सांगितले
या प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुणवंत कर्मचारी व अधिकारी यांना भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.