फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १९):-
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर फलटण या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक.१८जानेवारी २०२५ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पालटणार एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व ओळखून १९९० मध्ये लावलेल्या छोट्याशा रोपट्याचा आज एक वटवृक्ष तयार झाला आहे व तसेच अष्टपैलू विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलना सारखे सहशालेय उपक्रम नितांत गरजेचे असतात असे कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.भोजराज नाईक निंबाळकर (गव्हर्निंग कौन्सिल सदस्य फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण. व लायन्स इंटरनॅशनल मल्टीपल कौन्सिल व्हाईस चेअर पर्सन महाराष्ट्र यांनी सांगितले.
या कार्यक्रमा वेळी प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.उमेश महादेव दंडीले (पोलिस निरीक्षक गोरेगाव,मुंबई ) आणि मा.श्री.सचिन पोपटराव शिंदे (कृषी अधिकारी पुणे) हे उपस्थित होते.
प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच आम्ही देखील या प्रशालेचे माजी विद्यार्थी असल्याचे अभिमानाने सांगितले. या संस्थेने फलटणकरांना नेहमीच शिक्षणाच्या उत्तम संधी उपलब्ध करून दिल्याचे गौरवोद्ग्गारही काढले .प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.जाधव मॅडम यांनी पी.पी.टी वाचनाद्वारे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळेमध्ये राबवले जाणारे वर्षभरातील सर्व उल्लेखनीय उपक्रमांचे वाचन केले.
मान्यवरांच्या शुभहस्ते शाळेतील उपक्रमांचे ज्ञानशिदोरी हस्तलिखित व यशोगाथा चे प्रकाशन करण्यात आले.तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रशालेच्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीधारक सार्थक ठोंबरे व राजवीर गोवेकर या विद्यार्थ्यांना देखील गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रशालेच्या पहिल्या बॅच चे (१९९०-९१) माजी विद्यार्थी कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते.
बालकलाकारांनी मोठ्या उत्साहात व जल्लोषात आपला कलाप्रदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. यावेळी बहुसंख्येने उपस्थित पालक वर्ग व इतर श्रोत्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा उत्साहवर्धक होता.
या वार्षिक स्नेहसंमेलनावेळी फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य मा.श्री.शिवाजीराव घोरपडे,श्री.चंद्रकांत पाटील,श्री नितीन गांधी,महिला सदस्या सौ.वसुंधरा नाईक निंबाळकर (व्हॉईस चेअरमन स्कूल कमिटी) श्री.कुंडलिक नाळे (सदस्य स्कूल कमिटी स्व.शिलादेवी प्राथमिक विद्यामंदिर)फलटण एज्युकेशन सोसायटी प्रशासन अधिकारी मा.श्री.अरविंद निकम तसेच मा. रणवरे मॅडम (तपासणी अधिकारी फलटण एज्युकेशन सोसायटी), मा. लोंढे मॅडम (अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती) मा. श्री. नरुटे सर (संचालक गुरुद्रोण अकॅडमी),श्री.अहिवळे सर (प्राचार्य मुधोजी हायस्कूल व ज्यूनियर कॉलेज फलटण) दैनिक ऐक्य चे पत्रकार श्री.मुगूटराव कदम सर
शिक्षक व पालक संघाचे सदस्य,फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित सर्व प्राथमिक व बालक विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका, पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि फलटण शहरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुणे परिचय प्रशालेतील शिक्षक निलेश निंबाळकर,बक्षीस वितरण यादी वाचन नाळे सर , कार्यक्रमाचे आभार वरिष्ठ शिक्षिका सौ.रूपाली कदम यांनी व्यक्त केले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.