फलटण एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयाचा नॅक ए ग्रेड व एनबीए मानांकनाबद्दल कृतज्ञता सोहळा जल्लोषात संपन्न

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १९):– फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण महाविद्यालयाने नॅक ए ग्रेड व एनबीए मानांकन मिळवल्याबद्दल कृतज्ञता सोहळा व जल्लोष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या विशेष प्रसंगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान फलटण एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्राचार्य विश्वासराव देशमुख यांनी भूषवले होते. सोसायटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारीही या वेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. नरेंद्र नार्वे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत उपस्थितांचे स्वागत केले. प्राध्यापक अमरसिंह रणवरे यांनी एनबीए मानांकनाची महत्त्वाची माहिती दिली. प्राध्यापक गोविंद ठोंबरे यांनी महाविद्यालयाच्या अद्ययावत सुविधांची माहिती उलगडली. प्राध्यापक अभिजीत हिप्परकर यांनी स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसची ओळख करून दिली. प्राध्यापक महेश घाडगे यांनी इन्क्युबेशन सेंटरच्या कार्यप्रणालीवर प्रकाश टाकला. प्राध्यापक रोहन कोळपे यांनी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलची माहिती दिली. प्रा. प्रतिमा भोसले व प्रा. रुजल दोशी यांनी सुत्रसंचलन केले, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. शांताराम काळेल यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमासाठी विविध कंपन्यांचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी, प्राध्यापक, व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या यशामागील प्राचार्य व प्राध्यापकांच्या कष्टांचे कौतुक केले. सर्वांचे एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भविष्यातही महाविद्यालयाने नवीन उंची गाठावी व अधिकाधिक यश मिळवावे अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्री. रमणलाल दोशी, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सदस्य श्री भोजराज नाईक निंबाळकर, डॉ. पार्श्वनाथ राज वैद्य, श्री शिरीष भोसले, श्री शरदराव रणवरे, श्री. शिवाजीराव घोरपडे, श्री. नितीन गांधी, श्री. रणजीत निंबाळकर, श्री. पराग दोशी, श्री. सी. डी. पाटील फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानत, भविष्यातही असेच सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या कृतज्ञता सोहळ्याने महाविद्यालयाच्या यशाचा सन्मान केला व सर्वांना प्रोत्साहन दिले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!