अभिनय सादर करत असताना ज्ञानसागर चे विद्यार्थी
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती: प्रतिनिधी):-
जिल्हा परिषद ,शिक्षण विभाग, पुणे आणि डायट आयोजित यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाट्य स्पर्धेत बारामती तालुक्यात ज्ञानसागर इंग्लिश मिडियम स्कूल सावळ, बारामतीचे “बहुरूपी” हे नाटक प्रथम, हिंदीमधील माध्यमिक गटाचे “नकुशी का नामकरण” हे नाटक प्रथम आले.
उत्कृष्ट अभिनयाबद्दल तालुकास्तरीय स्पर्धेत बहुरूपी नाटकातील श्रेयस चव्हाण, श्रीतेज सोलनकर, व दूर्वा बनसोडे तर हिंदी नाटिकेतील वैष्णवी शिंदे,सोहम होले उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक जाहीर झाले.जिल्हास्तरीय अंतिम स्पर्धेतही खाजगी प्राथमिक गटातून बहुरूपी या मराठी नाट्य एकांकीने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला.उत्कृष्ट दिग्दर्शन व नेपथ्य यासाठी कलाशिक्षक श्रीराम सावंत यांना पारितोषिक जाहीर झाले आहे.एकूण प्रशालेस तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय मिळुन १५ पारितोषिके मिळणार आहेत.
बहुरूपी नाट्य एकांकिकेतील विजेत्या सर्व सहभागी विद्यार्थी व संगित शिक्षक कन्हैया पाटील , विद्यार्थ्यांमध्ये अन्वी सातकर, दूर्वा बनसोडे, आराध्या काळे, आयुषी जगताप, गुंजन गावडे, देवश्री लोखंडे, श्रेयस चव्हाण, श्रीतेज सोलनकर, मयूर सोरटे, वेदांत धायगुडे, प्रणव पवार, श्रेयस मुंडे, साईराज आगवणे,अनुष्का राऊत, संस्कृती शिरसागर या
सर्वांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डाॅ. सागर आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, सचिव मानसिंग आटोळे, विश्वस्त पल्लवी सांगळे, दिपक सांगळे,दीपक बिबे, सीईओ संपत जायपत्रे, विभाग प्रमुख गोरख वनवे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, सुधीर सोनवणे, नीलिमा देवकाते, राधा नाळे, नीलम जगताप व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीय यांनी अभिनंदन केले.