
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण , दि.24) :
आजी, माजी सैनिकांचे तसेच माजी सैनिक विधवा पत्नी, वीरमाता, वीरपिता यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
या बैठकीला जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतेश हंगे यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये माजी सैनिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. हे प्रश्न मार्गी लागण्याबाबत लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे बैठकीत तहसीलदार डॉ. जाधव यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. हंगे यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून कोणकोणत्या योजना राबविल्या जातात याची सविस्तर माहिती दिली.
