
मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक स्वीकारताना प्रा सुधाकर वाकुडकर
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २८):-
गुरुवार दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी महाराजा मंगल कार्यालय फलटण येथे १२ वे स्व. यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन महाराजा मंगल कार्यालय फलटण येथे आयोजित केले होते .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. इंद्रजीत देशमुख उर्फ काकाजी ( माजी प्रशासकीय अधिकारी) संमेलनात व बक्षीस वितरण समारंभात सहभागी झाले होते यावेळी बोलताना बुध्दी माणसामध्ये भेद निर्माण करते म्हणून हृदयाने एकत्र येणे गरजेचे आहे असे संबोधित केले .
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात नुकत्याच पार पडलेल्या प्राचार्य शिवाजीराव भोसले वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले यामध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्रा.वाकुडकर सुधाकर याना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले….
प्राचार्य शिवाजीराव भोसले वक्तृत्व स्पर्धेतील विजेतेपदाबद्दल प्रा.वाकुडकर सुधाकर यांचे विधान परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम ,तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा, प्राचार्य सुधीर अहिवले, उपप्राचार्य नितीन जगताप , ज्युनियर कॉलेज चे उपप्राचार्य सोमनाथ माने , शिक्षकवृंद व विवध मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
