

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या संघातील खेळाडू सोबत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,शिवाजीराव घोरपडे, प्राचार्या सौ मीनल दिक्षित,महादेवराव माने ,संजय फडतरे,सचिन धुमाळ ,अमोल नाळे ,अमित काळे
फलटण टुडे वृत्तसेवा (सांगली दि १८):-
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विभाग स्तरीय शालेय फुटसाल स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कामगिरी करून श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल सीबीसी च्या 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने विजय संपादन करून फुटसाल राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे. या संघाचा सत्कार माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी फ. ए. सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन मा. श्री शिवाजीराव घोरपडे साहेब, श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मीडियम स्कूल सीबीसी च्या प्राचार्य सौ मीनल दीक्षित मॅडम, क्रीडा समिती सदस्य श्री संजय फडतरे, श्री महादेव माने, तसेच फुटबॉल प्रशिक्षक ( फुटसाल ) अमित काळे व अमोल नाळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. फुटसाल या स्पर्धा स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे..या स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील मुलींच्या गटांमध्ये उपांत्य सामन्यांमध्ये सिंधुदुर्ग संघाचा 4-0 गोलने पराभव करून स्पर्धेचे अंतिम फेरी गाठली. अंतिम सामना अत्यंत चुरशीचा सांगली जिल्हा या संघाविरुद्ध झाला

या सामन्यामध्ये श्रेया बोबडे, वेदिका पाटील, सई भोईटे, व सई निंबाळकर या खेळाडूंनी प्रत्येकी एक एक उत्कृष्ट गोल नोंदवून हा सामना देखील 4-0 गोलने जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या यशस्वी खेळाडूंना फुटबॉल प्रशिक्षक श्री संजय फडतरे, श्री अमित काळे व श्री अमोल नाळे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी खेळाडूंना व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक सर्व यशस्वी खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दीपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एजुकेशन सोसायटीच्या नियामक मंडळा चे सर्व पदाधिकारी, फलटण एजुकेशन सोसायटीचे प्रशासनाधिकारी अरविंद निकम, तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा व फुटबॉलचे माजी खेळाडू, क्रीडाप्रेमी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
