
डेरवन येथे होणाऱ्या सब ज्युनियर धनुर्विद्या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या अनुश्रीचा सन्मान करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , महादेवराव माने ,सूरज ढेंबरे
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २७):-
सातारा येथे दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हास्तरीय मिनी सब ज्युनिअर व 10 वर्षाखालील धनुर्विद्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये( मूले व मुलींनी )खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत दिशा धनुर्विद्या ट्रेनिंग सेंटरमधे सराव करणाऱ्या मुधोजी हायस्कूल च्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले व डेरवन येथे होणाऱ्या सब ज्युनियर धनुर्विद्या स्पर्धेसाठी पात्र ठरले.
मुधोजी हायस्कूल येथे इयत्ता सहावी मध्ये शिकत असलेली कु अनुश्री विकास चौधरीची फेब्रुवारी २८ ते ०२ मार्च दरम्यान डेरवण, रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मिनी सब जुनियर धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे . अनुश्री चौधरीला श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम (सीबीएसई)चे क्रीडा शिक्षक व दिशा धनुर्विद्या ट्रेनिंग सेंटरचे संस्थापक सुरज ढेंबरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
अनुश्री चौधरी व तिला मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षक सुरज ढेंबरे यांचे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , फलटण -कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दीपकराव चव्हाण,फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण एजुकेशन सोसायटी च्या क्रीडा समितेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव घोरपडे , फलटण एजुकेशन सोसायटीच्या नियामक मंडळा चे सर्व पदाधिकारी,फलटण एजुकेशन सोसायटीचे प्रशासनाधिकारी अरविंद निकम , तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा ,मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री वसंतराव शेडगे व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या.
