विविध उदयोग हे देशाच्या आर्थिक विकासाचा कणा डॉ.चंद्रकांत पुलंकडवार(विभागीय आयुक्त,पुणे)

उद्योजक मार्गदर्शन कार्यक्रमात चंद्रकांत पुलकंडवार ,नवीन जैन,शरद सूर्यवंशी व इतर (छाया अतुल चव्हाण)

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि १०):-
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर बारामती विभागीय कार्यालय व युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या प्रसंगी एम.आय.डी.सी.चे प्रादेशिक अधिकारी हनुमंतराव पाटील, युनियन बँकेचे झोनल हेड श्री.नवीन जैन, रिजनल हेड श्री.मयंक भारद्वाज, एम.एस.एम.ई.लोन हेड अभिषेक कुमार, डेप्युटी जनरल हेड श्रीप्रसाद भालवणकर, बारामती शाखा प्रमुख संजीव कुमार तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विभागीय चेअरमन श्री.शरद सुर्यवंशी, व्हा.चेअरमन शिवाजीराव निंबाळकर, सुशीलकुमार सोमाणी, संचालक पी.टी.गांधी,सुरेश परकाळे, राहुल शहा वाघोलीकर, जगदिश पंजाबी, विलास आडके, भारत जाधव, साईनाथ चौधर, अविनाश गोफणे इ. उपस्थित होते.
या प्रसंगी बोलाताना पुढे म्हणाले की, खर्‍या अर्थाने भारताची अर्थव्यवस्था मोठया प्रमाणावर एम.एस.एम.ई. आणि कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. ही दोन्ही क्षेत्रे एकमेकांशी निगडीत असून ग्रामीण आणि शहरी भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात.
युनियन बॅँकेतर्फे त्यांच्या अनेक योजनांविषयी या प्रसंगी माहिती देण्यात आली यामध्ये प्रामुख्याने पी.एम.ई.जी.पी. प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम, मुद्रा लोन योजना, स्टॅन्ड अप इंडिया योजना, सी.एल.एस.जी.एस.-क्रेडीट लिंकड सबसीडी स्किम या सरकारी योजनांचा लाभ उदयोजक व अ‍ॅग्री उदयोजक शेतकरी कंपनी यांनी घ्यावे असे आवाहन करण्यात आले.
बारामती एम.आय.डी.सी.मध्ये एम.एस.एम.ई. शाखा नव्याने सुरु करावी अशी मागणी विभागीय चेअरमन शरद सुर्यवंशी यांनी केली व या शाखेतून प्रामुख्याने वरील नमूद केलेल्या सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी केली. या प्रसंगी मोठया प्रमाणावर उदयोजक, शेतकरी, महिला उदयोजक उपस्थित होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर तर्फे अशा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल युनियन बँकेने व विभागीय आयुक्त यांनी समाधान व्यक्त केले व यापुढेही अशा प्रकारचे कॅम्प गावपातळीवरही राबविणे जेणेकरुन या सर्व योजना तळागळापर्यंत पोहचविण्यास मदत होईल.
या प्रसंगी विविध क्षेत्रातील उद्योजक यांना कर्ज प्रकरणे मंजूर ची पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली

सूत्रसंचालन श्री अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन विभागीय व्हा.चेअरमन शिवाजी निंबाळकर यांनी मानले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!