
सौ. सुजाता सचिन यादव यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करताना मुख्याध्यापिका श्रीमती अनिताराणी कुचेकर,सौ वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर,मा. श्री. अशोक जिवराज दोशीव इतर मान्यवर
फलटण टुडे (फलटण दि २२ मार्च २०२५):-
फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिर,सस्तेवाडी प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहात आणि आनंददायक वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गॅलेक्सी को. ऑपरेटिव्ह सोसायटी फलटण च्या संचालिका मा. सौ. सुजाता सचिन यादव उपस्थित होत्या. तसेच प्रशालेच्या चेअरमन मा. सौ वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर, व्हाईस चेअरमन मा. सौ.नुतन अजितराव शिंदे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे, गव्हर्निंग कौन्सिलचे उपाध्यक्ष मा. श्री. अशोक जिवराज दोशी,फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य मा. श्री. शिवाजीराव घोरपडे फलटण एज्युकेशन सोसायटी गव्हर्निंग कौन्सिल बोर्ड ऑफ ट्रस्टिजच्या सदस्या मा श्रीमती उषादेवी पांडूरंग भोसले व फलटण एज्युकेशन सोसायटी गव्हर्निंग कौन्सिल, बोर्ड ऑफ ट्रस्ट्रिजचे सदस्य मा श्री सुरेंद्र ज्ञानचंद दोशी , श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिर, शाळा समितीचे सदस्य मा. श्री. संजय हंबीरराव भोसले, मा. श्री. कुंडलिक विष्णू नाळे, निमंत्रित सदस्य स्वर्गीय शीलादेवी शरदकुमार दोशी प्राथमिक विद्यामंदिर, कोळकी.फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी मा. श्री. अरविंद सखाराम निकम ,
मा.श्रीमती निर्मला सतिश रणवरें निमंत्रित सदस्या मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर, फलटण.श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. वेदपाठक सर तसेच प्राथमिक व बालक मंदिर च्या मुख्याध्यापिका,एम पी एस सी परीक्षेतून निवड झालेल्या व मंत्रालयात महसूल सहाय्यक पदी कार्यरत असलेल्या प्रशालेच्या माजी विद्यार्थीनी कु. स्नेहा बापू गवळी तसेच गुरुद्रोणा अकॅडमीचे सर व्यवस्थापक मा.श्री. नरुटे सर कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या सुंदर अशा ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रशालेच्या चेअरमन मा. सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर यांनी स्विकारले. या नंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा. सौ. सुजाता सचिन यादव यांनी सरस्वती पूजन व दिप प्रज्वलन केले. या नंतर प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती अनिताराणी कुमार कुचेकर यांनी आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले मा श्री योगेश भिसे सर यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. नंतर प्रशालेतील. “उत्कर्ष” या हस्तलिखिताचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. नंतर प्रशालेत घेण्यात आलेल्या विविध शालेय अंतर्गत स्पर्धेतील विजेत्याना बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी एकूण 40 विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व चषक देण्यात आले .

यानंतर प्रमुख पाहुण्या मा. सौ. सुजाता यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या इंग्लिश मेडीयम पेक्षा मराठी माध्यमाची मुले ही सर्व बाबतीत हुशार असतात. मातृभाषेतील मिळालेल शिक्षण हे परिपूर्ण असते. मराठी शाळेतच मुलांवर चांगले संस्कार केले जातात कला आणि ज्ञान माणसाकडे असेल तर माणूस आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी तो यशस्वी होऊ शकतो. कु.स्नेहा गवळी यांनी देखील आपले शाळेतील अनुभव सर्वांना सांगितले.
यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बक्षीस मिळालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच सर्व विद्याथ्यांना उत्कृष्ठ कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला ज्या मध्ये नाटक, नृत्य इत्यादीचा समावेश होता. हे कार्यक्रम पाहून सर्व उपस्थित मान्यवर प्रेक्षक, पालक मंत्रमुग्ध झाले. या स्नेह संमेलनाच्या माध्यमातून शाळेने पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संबंध आणखी हृद केले
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातारणात संपन्न झाले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती अनिताराणी कुचेकर यांनी केले. तर मान्यवरांचे आभार सौ अनिता बागल यांनी मानले
