जैन सोशल ग्रुप फलटणच्या अध्यक्षपदी श्रीपाल जैन यांची निवड!


फलटण टुडे (फलटण दि १७ एप्रिल २०२५):-

सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या जैन सोशल ग्रुप फलटणच्या सन 2025- 2027 कार्य कालासाठी श्री‌‌.श्रीपाल जैन यांची नुकतीच अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
तसेच सचिव पदी सौ.निना कोठारी,खजिनदार पदी श्री.राजेश शहा व कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
तसेच जैन सोशल ग्रुप अंतर्गत संगिनी फोरमच्या अध्यक्ष पदी सौ.मनिषा व्होरा,सचिव पदी सौ. वृषाली गांधी, खजिनदार पदी सौ. विनयश्री दोशी व कार्यकारणी ची निवड करण्यात आली.
जैन सोशल ग्रुप अंतर्गत युवा फोरमच्या अध्यक्षपदी पुनीत दोशी, सचिव पदी सिद्धांत शहा, खजिनदार पदी मीहीर गांधी व कार्यकारणी ची निवड करण्यात आली.
जैन सोशल ग्रुप अंतर्गत तिन्ही ग्रुपच्या नूतन कार्यकारणी निवडीबद्दल जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष श्री. बिरेनभई शहा, महाराष्ट्र रीजन अध्यक्ष श्री.दिलीपभई मेहता,सचिव श्री.सचिनभई शहा, उपाध्यक्ष श्री‌. सचिन दोशी, फलटण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री‌. मंगेशभई दोशी, जैन सोशल ग्रुपच्या माजी अध्यक्षां सौ. सविता दोशी,श्री. राजेंद्र कोठारी, डाॅ.श्री. सूर्यकांत दोशी,माजी सचिव श्री. प्रीतम शहा , संगीनी फोरम संस्थापक अध्यक्षां सौ.स्मिता शहा व सर्व पदाधिकारी संचालक व सदस्य यांनि नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.दि.२२ एप्रिल रोजी जैन सोशल ग्रुप परिवार नुतन कार्यकारिणीचा
शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!