
सायली आटोळे वीरकर
फलटण टुडे (बारामती दि २५ एप्रिल २०२५):-
सावळ येथील सायली अप्पासो आटोळे वीरकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये ‘महसूल सहाय्यक’ पदावर निवड झाली आहे
सहा महिन्यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क जवान या पदावर त्यांची निवड होऊन बारामती मध्ये कार्यरत झाल्या होत्या जिद्द चिकाटी आत्मविश्वास या जोरावर अभ्यास करत त्यांनी महसूल सहाय्यक या पदापर्यंत गवसणी घातल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे सावळ येथील डॉ अप्पासो आटोळे यांच्या कन्या असून कोणताही क्लास न लावता स्वतः अभ्यास करत त्यांनी यश मिळवले आहे त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे