एच डी ए डान्स अकॅडमी चे उन्हाळी शिबिर संपन्न

बक्षिस वितरण करताना मान्यवर व सोबत विद्यार्थी

फलटण टुडे (बारामती दि १८ मे २०२५):-
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व नृत्य कौशल वाढीसाठी एच डी ए डान्स अकॅडमी यांच्या वतीने उन्हाळी प्रशिक्षण शिबीर चे आयोजन करण्यात आले होते
यांचा समारोप १४ मे रोजी संपन्न झाला.
या प्रसंगी एच डी ए डान्स अकॅडमी चे संचालक विकास पवार,
हॉटेल व्यवसायिक अदिती दिलीप पाटील, अक्षय कबीर ,कुणाल सोनवणे, सौरभ जाधव ,बाईक रायडर रोहित शिंदे व विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
विद्यार्थी ना नृत्य कला शिकवत असताना आत्मविश्वास वाढतो ,व्यासपीठावर अभिनय व संभाषण कला सादरीकरण करण्याचे धाडस येते ,तणाव कमी होतो त्यामुळे नृत्य शिकणे ही काळजी गरज असल्याचे हॉटेल व्यवसायिक अदिती दिलीप पाटील यांनी सांगितले.
हजारो लोकांसमोर धाडसाने बोला व अभिनय करा ,नृत्य सादर करने हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यावे व त्यांच्यामधील सुप्त कलागुणांना वाव भेटावा म्हणून सदर उन्हाळी शिबिराचे आयोजन केल्याचे प्रशिक्षक विकास पवार यांनी सांगितले.
सदर शिबिरामध्ये प्राथमिक स्वरूपातील व गरजेनुसार ऍडव्हान्स नृत्य कला, अभिनय, संभाषण,स्टेज डेअरिंग चे प्रशिक्षण देण्यात आले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!