
फलटण टुडे (फलटण दि १८ मे २०२५):-
फलटण एज्युकेशन सोसायटीचे मालोजीराजे शेती विद्यालय व जुनिअर कॉलेज फलटण. येथे इयत्ता अकरावी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी निःशुल्क ऑनलाइन नावनोंदणी सुविधा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. यंदा प्रथमच शासन निर्णयानुसार ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने गुणवत्तेनुसार प्रवेश होणार असल्याची माहिती मालोजीराजे शेती विद्यालया व जुनिअर कॉलेज चे प्राचार्य श्री. संजय वेदपाठक यांनी दिली. विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दि. १९ ते २८ मे या कालावधीत प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. फलटण तालुक्यासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून फलटण एज्युकेशन सोसायटीचे मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज फलटण , हे नेहमीच कटिबद्ध असून, महाविद्यालयाने गुणात्मक आणि संख्यात्मक दर्जा राखत उज्ज्वल यशाची दीर्घ परंपरा टिकवून ठेवली आहे. विद्यालयामधे विज्ञान या शाखेतून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाची सोय उपलब्ध असून पीक शास्त्र ( Crop Science, प्रवेश क्षमता =150,
दुग्ध व्यवसाय पशुसंवर्धन (Animal scinece)प्रवेश क्षमता =150
(Horticulture) फलोद्यान एकूण प्रवेश क्षमता =150 (गुण=200) पीक उत्पादन या विषयांची निवड करण्याची विद्यार्थ्यांना संधी आहे. विद्यालयामध्ये प्रशस्त ग्रंथालय, भव्य क्रीडांगण, विविध खेळांचे स्वतंत्र मार्गदर्शन, विविध प्रकारच्या सरकारी आर्थिकसवलती व शिष्यवृत्ती, अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग, स्पर्धा परीक्षांचे केंद्र, विविध विषयांवरील चर्चासत्रे व परिसंवादाचे आयोजन, , एन. एस. एस., अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना, अशा अत्याधुनिक सुविधा मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत या सुविधांचा विद्यार्थ्यांनी विद्यालयामध्ये प्रवेश घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क
प्रा. श्री. संजय वेदपाठक, 8796267880
प्रा. श्री. काळे बी. डी. मोब.-9309739052,
श्री. कदम A. A मोब.-9970839961
सौ.कदम पी. व्ही 9011867883
यांच्याशी संपर्क करण्यात यावे असे आवाहन प्रवेश प्रक्रिया समितीने केले आहे.
