बारामतीच्या लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनचा दहावीचा निकाल १००%

लडकत स्कुल ऑफ फौंडेशन चे यशस्वी विद्यार्थी व नामदेव लडकत व इतर


फलटण टुडे (बारामती दि १८ मे २०२५
येथील लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत १००% निकालाची घौडदौड कायम राखली आहे. विद्यालयाच्या सेमी इंग्रजी विभागात सिद्धी धर्माधिकारी हिने 96.६०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. अभिषेक सानप९३.६०% दुसरा, तर समीक्षा देवकाते ९२.४०% हिने तिसरा क्रमांक मिळवला.

इंग्रजी माध्यम विभागातून गौरी ढमे हिने ९३.८०%गुणांसह प्रथम क्रमांक, प्रणवराज गोलांडे (९१%) दुसरा, तर कु. रुतुजा पवार हिने ९०.६०% गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला आहे.

विद्यालयातील एकूण ११ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवले असून, ६३ विद्यार्थी ८०% पेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. ७५ हून अधिक विद्यार्थ्यांनी ८०% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनमध्ये नीट, जे ई ई व सी ई टी परीक्षांची तयारी केली जाते असून, यंदा काही विद्यार्थी सरळ सरकारी एमबीबीएस कॉलेजसाठी पात्र ठरले आहेत तसेच नीट व शासकीय अभियांत्रिकी कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला आहे. सध्या ११ वीसाठी प्रवेश सुरू आहेत.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन नामदेव लडकत व गणेश लडकत, प्राचार्य रामचंद्र वाघ, तानाजी गवळी तसेच डायरेक्टर प्रियांकालडकत व शुभांगी लडकत यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अनिल काशीद यांनी केले.


——-///////-

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!