ज्ञानसागरच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आर्थिक सन्मान

विद्यार्थ्यांचा सन्मान करत असताना मान्यवर व प्रा.डॉ. सागर आटोळे

फलटण टुडे (बारामती दि २२ मे २०२५):-
इयत्ता दहावी मध्ये सर्वोत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक शाबासकी देऊन सन्मान करणार असल्याचे ज्ञानसागर गुरुकुल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सागर आटोळे यांनी जाहीर केले होते त्याप्रमाणे इयत्ता १० वी मार्च २०२४-२५ मधील प्रथम क्रमांक श्रावणी संतोष पवार ५०,००० /-, द्वितीय क्रमांक किशोर घोरपडे २०,०००/- तिसरा क्रमाक सिद्धी प्रकाश शिंदे १०,०००/-
व तनुजा जनार्दन आटोले १०,०००/- ,श्रवण नरेंद्र गोफणे १०,०००/- , श्रेया नितीन कांबळे १०,०००/-, दिग्विजय दिपक तिवाटणे ५०००/-, श्रावणी सुरेश बनसोडे ५०००/-, आर्यन नवनाथ वरे ५०००/- रुपये ,सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे बारामती जिल्हा व सत्र न्यायालयातील सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ॲड. सचिन वाघ , ॲड. शुभम निंबाळकर ,ॲड. अमरसिंह मारकड व व इतर मान्यवर उपस्तीत होते.
विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवले आहे पुढील शिक्षणासाठी त्यांना आर्थिक मदत व्हावी या उदेश्याने सदर बक्षिसे दिली असल्याचे प्रा डॉ सागर आटोळे यांनी सांगितले.


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!