प्रतिपशचंद्र युवक समितीच्या वतीने संभाजी महाराज जयंती साजरी

फलटण टुडे (बारामती दि २२ मे २०२५):-
छत्रपती संभाजी महाराज यांनी कमी वयातील केलेले कार्य व त्यांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान हे जगातील सर्वश्रेष्ठ बलिदान असल्याचे प्रतिपादन इतिहासकार व्याख्याते शंतनू परांजपे यांनी प्रतिपादन केले
प्रतिपशचंद्र युवक समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा निमित्त विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय केलेल्या गुणवंतांचा सन्मान व इतिहासकार शंतनू परांजपे यांचे व्याख्यान आयोजित केले होते या वेळी परांजपे बोलत होते या प्रसंगी नगरसेवक जयसिंग देशमुख,ऍड भार्गव पाटसकर,बापु साहेब जाचक, किशोर हिंगणे व प्रतिपशचंद्र युवक समितीचे अध्यक्ष सुरेश घाडगे, कार्याध्यक्ष निलेश जाधव, खजिनदार शुभम बर्डे सचिव प्रशांत फडतरे ,सदस्य मनोज माने, नागेश वाघमोडे ,सुहास गायकवाड, गणेश कोकीळ आदी मान्यवर उपस्तीत होते.
संभाजी महाराज यांना स्वकीय बरोबर परकीय शत्रूशी लढावे लागले हे दुर्दैव,कमी वयात त्यांनी स्वराज साठी केलेले कार्य इतिहासात समरणीय राहील असे ही शंतनू परांजपे यांनी सांगितले
वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल डॉ सुनील पवार, शेती क्षेत्रामध्ये दिलेले योगदानाबद्दल अमित जगताप,गोरक्षक म्हणून व विष्णू हिंदू परिषद सातारा जिल्हा प्रमुख शरद गाडे, राष्ट्र प्रथम प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष अविनाश तायडे, हिंदू राष्ट्र सेना प्रमुख बारामतीचे अध्यक्ष विकी आगम आदींना विविध क्षेत्रातील योगदान बदल सन्मानित करण्यात आले.
पुढील पिढीला छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य व स्वराज्याबद्दल केलेले कार्य माहीत व्याहवे म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे अध्यक्ष सुयश घाडगे यांनी सांगितले.
सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले