वंजारवाडी ग्रामपंचायत च्या उपसरपंचपदी चिन्मयनंदा चौधर यांची बिनविरोध निवड.

उपसरपंच चिन्मयनंदा नितीन चौधर

फलटण today( बारामती दि २३ मे २०२५):
बारामती तालुक्यातील वंजारवाडी ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी चिन्मयनंदा नितीन चौधर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.(मंगळवार २० मे )
उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने चिन्मयनंदा चौधर बिनविरोध निवडुन आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी निलेश लव्हटे यांनी केली .
या प्रसंगी सरपंच जगन्नाथ वणवे, ग्रामसेवक निलेश लव्हटे व सदस्यां राणीताई चौधर , दीपाली चौधर, शशिकला जगताप, संगीता मालुसरे व माजी उपसरपंच व सदस्य सागर दराडे , गोरख चौधर,भारत चौधर, बाबासाहेब ठोकळे तसेच राष्ट्रवादी युवक चे कार्याध्यक्ष शरद चौधर ,
पोलिस पाटील पोपट चौधर , नितीन चौधर ,नवनाथ चौधर,सुनिल चौधर,समीर चौधर,पोपट दराडे ,राहुल शिरसट,अजित चौधर, विजय चौधर,सागर सुर्यवंशी ,सोमनाथ दराडे,बंडू खोगरे,सुनील चौधर, सचिन चौधर,सागर चौधर, विनोद करपे, पिंटू सावंत, मारुती खोमणे, सुभाष झगडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
.ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना तळागाळातील ग्रामस्थांन पर्यंत पोहचवू व विकासकामात अग्रेसर राहून आदर्श ग्रामपंचायत म्हणून वंजारवाडी ग्रामपंचायत चा नावलौकिक करू असे निवडीनंतर चिन्मयनंदा चौधर यांनी सांगितले.
ग्रामसेवक निलेश लवटे यांनी आभार मानले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!