
फलटण टुडे (फलटण दि २४ मे २०२५):-
फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ,फलटण या विद्यालयात इयत्ता आठवी मध्ये शिकत असणारा धावपटू कु.आयुष गणेश शिरतोडे याने दिल्ली येथे दि.21 ते 23 मे 2025 या कालावधीत स्टेअर्स फाउंडेशन, आयोजित राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेत 14 वर्ष वयोगटातील 400 मी. धावणे या क्रीडा प्रकारामध्ये रौप्य पदक संपादन केलेले आहे.

कु आयुष गणेश शिरतोडे यास मैदानी खेळाचे मार्गदर्शक श्री.राज जाधव , श्री.तायाप्पा शेंडगे यांचे मार्गदर्शन लाभले. कु.आयुष गणेश शिरतोडे याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा विधान परिषदेचे मा. सभापती मा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आणि सेक्रेटरी तथा महाराष्ट्र खो -खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे क्रीडा समितीचे अध्यक्ष व गव्हर्निंग कौन्सिले सदस्य श्री. शिवाजीराव घोरपडे ,प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, तपासणी अधिकारी श्री दिलीप राजगुडा,सहायक तपासणी अधिकारी श्री सुधीर अहिवळे, मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. वसंत कृष्णा शेडगे, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने,पर्यवेक्षिका सौ. पूजा पाटील, फलटण एज्युकेशन सोसायटी चे नियामक मंडळ सदस्य , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, क्रीडा समितीचे ज्येष्ठ सदस्य श्री महादेव माने, क्रीडा समितीचे सचिव श्री सचिन धुमाळ आदी सह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
