
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ०२ जून २०२५):-
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये शनिवार दिनांक ३१ मे २०२५ रोजी सर्व जुने २००५/०६ च्या विद्यार्थ्यानी एकत्र येऊन गेट-टुगेदर उत्साहात सजरे केले .
या गेट-टुगेदर ला प्रमुख उपस्थितीमुधोजी हायस्कूलच्या माजी प्राचार्या सन्मानीय सौ आवटे मॅडम , सन्माननीय डी टी नाळे सर , सन्माननीय रणनवरे सर ,सन्माननीय महात सर यांची उपस्थिती होते. यावेळी वरील सर्व आम्हाला घडवणाऱ्या गुरुजनांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमामध्ये सौ. सायली अमोल नलवडे / कवीतकर यांनी २०१९ व २०२४ च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये विविध राजकीय नेत्यांसाठी काम केले. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्याना महामहिम राज्यपाल यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशातील पॉलिटिकल कॅम्पेन चालवणारी एकमेव महिला म्हणून सौ सायली अमोल नलावडे / कवितकर यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. यांनी स्वतःचा यूट्यूब चॅनेल विश्लेषण वाइब हा चालू केला आहे. आशा उत्तुंग भरारी घेणाऱ्या विद्यार्थिनी मुधोजी हायस्कूलमध्ये घडल्या आहेत या जाणिवेचा सार्थ अभिमान ठेवून संपूर्ण शिक्षक वर्गाचा व २००५/ ०६ या वर्षाच्या दहावी ‘ ब ‘ या वर्गातील विद्यार्थ्यांचे उर भरून आले.
या वेळी सौ सायली अमोल नलावडे यांचा सत्कार मा. प्राचार्या सौ आवटे मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

याचबरोबर २००५/०६ च्या दहावी ब चे आणखी एक गुणवंत धाडसी विद्यार्थी श्री. स्वप्निल मनोहर पखाले यांनी अतिशय हालाखीच्या परिस्थितीमध्ये स्वतःवरती विश्वास ठेवून स्वतःच स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या गावाचं नाव उज्वल करण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन २०११ सली भारतीय वायुदलामध्ये सामील झाले. त्याचसोबत स्वतःचे नाव भारतीय वायुदल खेळ विभागामधील शरीरसौष्ठव या क्रीडा प्रकारामध्ये २०१६ / १७ या सली ऑल इंडिया एअरफोर्स चॅम्पियनशिप जिंकून आपले व फलटण तालुक्याचे व जिल्ह्याचे त्याचबरोबर राज्याचे सुद्धा नावलौकिक केले. अगदी यशस्वीरित्या ते आज सद्धा भारतीय वायुदलामध्ये अविरत कार्यरत आहेत. हे सुद्धा मुधोजी हायस्कूलचे विद्यार्थी आहेत याचा सार्थ अभिमान बाळगून त्यांचा सत्कार सर्व शिक्षक गणांच्या शुभहस्ते करण्यात आला.
२००५ / ०६ दहावी ब या बॅचमधील सर्व विद्यार्थी आपापल्या क्षेत्रामध्ये योग्य व सक्षमपणे योगदान देत आहेत. देशघडवण्यासाठी आपापल्या क्षमतेनुसार हातभार लावत आहेत. हे पाहून शिक्षकांचा अभिमानाने उर भरून आले.
या स्नेहसंमेलनासाठी काही दिवस आधी अपार कष्ट करून सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचे काम श्री. श्रीनिवास भुजबळ, श्री. सागर दोशी, श्री. अक्षय झोरे यांनी अहोरात्र काम केले. तसेच स्नेहसंमेलनाचे रिटर्न गिफ्ट म्हणून विविध प्रकारच्या विविध जातीची रोपे माजी विद्यार्थ्यांना देण्याची संकल्पना श्री. श्रीनिवास भुजबळ व श्री. सागर जोशी यांनी सत्यात उतरवली . अगदी
या स्नेहसंमेलनासाठी फलटण ,पुणे, मुंबई तसेच भारताबाहेरील दुबई, अमेरिका येथील विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.
यानंतर दुपारी दोन वाजता फलटणमधील नव्याने सुरू झालेल्या रॉयल क्राऊन या इमारतीमधील हॉटेल सेलिब्रेशन येथे स्नेहभोजनाचा आस्वाद जुन्या मित्र मंडळींनी घेतला व संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या तसेच आनंदी वातावरणामध्ये पार पडला.

