गुणवतांचा सन्मान ही संस्कृती जोपासा : अजित पवार

रियल डेअरी च्या वतीने शैक्षणिक मदत

विराज गाडेकर यांचा सन्मान करताना अजित पवार व सोबत मनोज तुपे प्रा ज्ञानेश्वर मुटूकळे

फलटण टुडे वृत्तसेवा( बारामती दि २२ जून २०२५):-
ज्ञानी व गुणवतांचा सन्मान करणे व त्यांच्या पाठीवर शाबासकी देणे ही परंपरा व संस्कृती आहे तिची जोपासना अत्याधुनिक काळात सुद्धा झाली पाहिजे त्यासाठी गुणवतांचा सन्मान ही वृत्ती जोपासा असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामती एमआयडीसी येथील रियल डेअरी चे चेअरमन मनोज तुपे यांनी त्यांचे वडील कै. कुंडलिक तुपे यांच्या स्मृति प्रित्यर्थ गरजू व होतकरू विद्यार्थ्यास आर्थिक मदत करण्याचा संकल्प प्रथम पुण्यसमरण दीना निमित्त केला होता, त्याची संकल्पपूर्ती म्हणून चि. विराज गाडेकर यास त्याच्या पुढील शिक्षणासाठी चेक पन्नास हजार रुपये चा चेक देऊन आर्थिक मदत केली.
या वेळी अजित पवार उपस्थित यांना मार्गदर्शन करत होते.
या प्रसंगी फलटण कोरेगाव चे आमदार सचिन पाटील व रियल डेअरी चे चेअरमन मनोज तुपे , व्यवस्थापकीय संचालिका अनिता तुपे ,विविध दूध संस्थांचे चेअरमन, अधिकारी ,सभासद आणि आचार्य अकॅडमी चे संस्थापक चेअरमन ज्ञानेश्वर मुटूकळे आणि इतर मान्यवर उपस्तीत होते.
आचार्य अकॅडमी बारामती चा विद्यार्थी जेईई मेन्स मध्ये सर्वाधिक ९९.६३.% गुण मिळवणारा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला गावचा विद्यार्थी चि. विराज सुरेश गाडेकर हा आर्थिक दृष्ट्या कमकुवत गटातील असून वडील एका खाजगी शाळेत क्लार्क असून आई बालवाडी शिक्षिका आहे परंतु जिद्द चिकाटी व आत्मविश्वास जोरावर त्याने यश मिळवले असून त्यास पुढील शिक्षणासाठी म्हणून आर्थिक मदत करत असल्याचे
मनोज तुपे यांनी सांगितले.
गुणवत्तेला वाव देत आर्थिक मदत करणे हे व भविष्यातील होतकरू विद्यार्थी घडविणे साठी साह्य करणे कौतुकास्पद असल्याचे आचार्य अकॅडमी चे चेअरमन ज्ञानेश्वर मुटूकळे यांनी सांगितले
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार धुंढीराज देव यांनी मानले.

चौकट:
शैक्षणिक मदत मिळाल्याने पुढील शिक्षण घेण्याचे बळ वाढले आणखीन शिक्षण घेऊन जगात भारताचे नाव उज्जवल करण्याचा मानस असून ही मदत कायमस्वरूपी हृदयात राहील विराज गाडेकर


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!