
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २२ जून २०२५):-
श्री संत सावतामाळी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मतिमंद मुलांचे निवासी पुनर्वसन केंद्र गोजुबावी तालुका बारामती या पुनर्वसन केंद्रामधील मतिमंद मुलांनी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून योग दिन साजरा केला. यामध्ये त्यांच्या क्षमतेनुसार सुरुवातीला वारमाफ करून प्रार्थना केली त्यानंतर सूक्ष्म व्यायाम त्यामध्ये मानेचे व्यायाम खांद्याची व्यायाम कमरेचे व्यायाम गुडघ्याचे व्यायाम इत्यादी करण्यात आले. नंतर उभे राहून करायचे आसणे बसून करावयाची असणे भद्रासन पोटावर जपून करावयाचे असणे त्यामध्ये भुजंगासन पाठीवर झोपून करावयाचे असणे कपल भारतीय प्राणायाम इत्यादी योग करण्यात आले योग दिन कार्याध्यक्ष श्री नंदकुमार फुले अध्यक्ष राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या साठी सर्व सहकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले.