

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २२ जून २०२५):-
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे आंतरराष्ट्रीय योग दिन फलटण एज्युकेशन सोसायटी व सुहासिनी योग डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण येथे सुहासिनी योगचे संचालक योगगुरु – श्री प्रवीण बांदकर , योग प्रशिक्षक कु. श्रुती शिंदे, योग प्रशिक्षक कु. गायत्री शेटे, योग प्रशिक्षक श्री प्रसाद महामूलकर या ग्रुपच्या वतीने तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग फलटणच्या ज्येष्ठ योग प्रशिक्षक सौ नीलिमा दाते मॅडम व योग रेखा योग क्लासेसच्या संचालिका सौ रेखा खलाटे मॅडम यांनी विद्यार्थ्यांकडून योगासनाचे व प्राणायामचे विविध प्रात्यक्षिक करून घेतले. तसेच योगासन व प्राणायामचे महत्त्व देखील यावेळी सांगण्यात आले.
तसेच मुधोजी हायस्कूलची आंतरराष्ट्रीय योगा खेळाडू कुमारी श्रेया खिलारे हिनेदेखील योगासनाचे उत्कृष्ट असे प्रात्यक्षिक करून दाखवले.यामध्ये प्रशालेचे 400 ते 500 विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच प्रशालेतील सर्व अधिकारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील सहभाग घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.

याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य श्री वसंतराव शेडगे , ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने , पर्यवेक्षिका सौ पूजा पाटील , ज्येष्ठ शिक्षिका सौ.लतिका अनपट यांनी उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
प्रशालेचे प्राचार्य श्री वसंतराव शेडगे सरांनी सर्व विद्यार्थ्यांनी योगासन व प्राणायामाचा सराव हा दररोज न चुकता करावा असे आवाहन केले तसेच ज्युनिअर विभागाचे उप प्राचार्य श्री सोमनाथ माने यांनी नवीन अभ्यासक्रमामध्ये योगा हा विषयाचा समावेश केलेला आहे असे सांगून याचे महत्त्व सांगितले.
या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेचे क्रीडा विभाग प्रमुख श्री सचिन धुमाळ , ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री जाधव डी .एन., सौ गावडे , कु. धनश्री क्षीरसागर यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री खुरंगे बी.बी. यांनी केले.
चौकट:
मुधोजी हायस्कूल मधील इयत्त ५ वीतील विद्यार्थिनी कु मृण्मयी किरण जाधव व कु प्रणिती राहुल जाधव यांनी यावेळी योगाचे उत्कृष्ट कौशल्य सादर केले याबद्दल प्रशालेचे प्राचार्य श्री वसंतराव शेडगे यांनी दोघींचे विशेष कौतुक केले व त्यांना गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.
