फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्नेहभोजन व अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न!

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १५ एप्रिल २०२६ ):- : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात नगरसेवक विकास वसंतवराव काकडे (सर) यांच्या वतीने आयोजित स्नेहभोजन व अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम २५ वर्षांपासून सातत्याने राबवला जात आहे.

कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. फलटण शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

विधान परिषदेचे मा. सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे ही अभिवादनासाठी कायम उपस्थिती लावतात ,फलटण कोरेगाव विधानसभेचे माजी आमदार दिपक चव्हाण हे उपस्थिती असतात. तसेच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर यांनीही २५ वर्षाच्या परंपरेनुसार उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले. फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनीही सदिच्छा भेट देत कार्यक्रमात सहभाग घेतला.

नगरसेवक विकास काकडे यांनी “समाजाचे आपण काही देणे लागतो” या भावनेतून हा उपक्रम राबवत असतात समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा हा प्रेरणादायी प्रयत्न असून, यामुळे सामाजिक एकोपा आणि बंधुभाव अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवर:
आस्था टाईम्सचे संपादक दादासाहेब चोरमले (पत्रकार ), नगरसेवक संदीप चोरमले, विजयकुमार पाटील मुख्याध्यापक (वडले ), नगरसेवक विशाल तेली, किशोर ताळरकर, नगरसेवक पप्पू शेख, नगरसेविका स्मिता शहा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शैक्षणिक क्षेत्रातील उपस्थिती:
महामुलकर सर (प्राचार्य), रूपननवर सर (प्राचार्य), येवलेकर सर (प्राचार्य), अरुण काकडे सर (प्राचार्य), सुधीर अहिवळे सर ( प्राचार्य ) बोराटे सर (मुख्याध्यापक), जगदाळे सर (प्राचार्य), रेपाळ सर तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी उपस्थित होते. तसेच विविध समाजातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते .

शुभेच्छा देणारे:
नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर जि.प. सदस्या वैशालीताई कांबळे , नगरसेवक पांडुरंग (आबा ) गुंजवटे, मा नगरसेवक किशोरभैय्या नाईक निंबाळकर , मा नगरसेवक अनुप शहा ,नगरसेविका शिदाली शहा नगरसेवक पंकज पवार नगरसेविका कविता मदने ,

हा उपक्रम सामाजिक एकात्मतेचा आदर्श निर्माण करणारा ठरत असून, सर्व स्तरातील नागरिकांना एकत्र आणण्याचे तसेच मंगलमैत्री निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!