जिल्हा प्रशासनाकडून पालखी मार्गावर 15 ते 19 जुलै या कालावधीत ड्राय डे घोषित*

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. १५ जुलै २०२६):- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हयातील पालखी मार्गवरीलदारूची दुकाने दि.15 ते दि.19 जुलै, 2026 या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार पालखीच्या मार्गक्रमणानुसार खालीलप्रमाणे कोरडा दिवस (ड्राय डे) घोषित करण्यात आले आहेत.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थावन, मार्गक्रमण व मुक्कामाच्या ठिकाणी व मुक्कामाच्या दिवशी सर्व प्रकारची दारूची दुकाने, देशी दारू किरकोळ विक्री (सीएल-3), बिअर विक्री परवाने (एफएल/बीआर-3), विदेशी मद्यविक्री (एफएल-3) परवानाकक्ष (एफएल-3) बिअरबार (फॉर्म ई) व ताडी दुकाने (टिडी-पुढील तारखांना विविध ठिकाणी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 15 जुलै रोजी पाडेगाव, बाळ पाटलांची वाडी, लोणंद शहर. दि.16 जुलै रोजी लोणंद शहर व परिसर (तसेच तरडगावला पालखी पोहोचेपर्यंत लोणंद बंद राहील). दि. 17 जुलै रोजी तरडगाव ते फलटण रस्त्यावरील व फलटण शहर व परिसर काळज, सुरवडी, निंभोरे ओढा, वडजल., दि.18 जुलै रोजी फलटण ते बरड रस्त्यावरील व बरड, विडणी, पिंपरद, निंभळक फाटा., दि. 19 जुलै रोजी साधुबुवाचा ओढा, धर्मपूरी, बरड व राजुरी पानसकरवाडी (पालखी पुढे सोलापूर जिल्ह्यात जाईपर्यंत बंद).  या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध (परवानाधारक) मुंबई मद्य निषेध कायद्यानुसार अत्यंत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच दुकान बंद ठेवण्यात आलेल्या कालावधीसाठी कोणतीही नुकसान भरपाई दिली जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!