गोरख पारसे यांची जन आरोग्य समितीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती

गोरख पारसे यांना नियुक्ती चे पत्र देताना डॉ गाडेकर

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती, दि ३० ऑगस्ट २०२६):-
राष्ट्रीय नागरी आरोग्य केंद्र अंतर्गत अनंत अशा नगर येथे नागरी आरोग्य केंद्र मध्ये शासन निर्णयानुसार जन आरोग्य समिती च्या अध्यक्षपदी बारामती नगर परिषदेचे नगरसेवक गोरख पारसे यांची जन आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नोडल आरोग्य अधिकारी ,बारामती नगर परिषद व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पंचायत समिती आरोग्य विभाग यांच्या अखत्यारीत सदर विभागाचा कार्यभार चालत असून

Screenshot


केंद्र शासनामार्फत राज्यात आरोग्यसेवा मधील समस्याचे निराकरण करण्यासाठी आयुष्यमान भारत योजना अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर आयुष्या आरोग्य मंत्री नागरी प्राथमिक केंद्रात केले असून नागरी भागात नव्याने आयुष्यमान आरोग्य केंद्र नागरी आरोग्य केंद्र सुद्धा स्थापित केलेले आहे आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या कार्यक्षेत्रातील लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिबंधात्मक प्रसारक उपचारात्मक पूर्णवसनात्मक आणि उपशामक वृद्धापकाळित कालची आरोग्य सेवा प्रदान करण्याचे प्रथम संपर्क ठेवने आदी कार्य केले जाते
प्राथमिक उपचार देत नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे गोरख पारसे यांनी सांगितले.
या प्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ मकरंद गाडेकर, व संतोष जाधव, बालाजी गुळवे, शेखर अहिवळे, दीपक गुळवे, नारायण ढोबळे,हिरामण माने व पारिचारिका,सहायक,व स्थानिक नागरिक आदी उपस्तीत होते.


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!