निवृत्तीवेतनधारकांसाठी ७ सप्टेंबर रोजी सातारा कोषागारात कार्यशाळा

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि.१ सप्टेंबर २०२६):- राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारक आणि कुटूंब निवृत्तीवेतन धारकांना राज्य शासनाने विकसित केलेल्या महा उपलब्धी या अधिकृत मोबाइल ॲपद्वारे निवृत्तीवेतनविषयक सेवा आता सहज उपलब्ध होणार आहेत. या ॲपमुळे निवृत्तीवेतनाशी संबंधित माहिती त्वरीत, अचूक व पारदर्शक स्वरुपात उपलब्ध होणार असून निवृत्तीवेतनधारकांची कोषागार कार्यालयात प्रत्यक्ष भेटीची आवश्यकता कमी होणार आहे. ॲपच्या वापराबाबत माहिती व प्रात्यक्षिक देण्यासाठी तसेच निवृत्तीवेतन धारकांच्या अडीअडचणी आणि शंकांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, सातारा आणि सेवानिवृत्ती कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा कोषागार कार्यालयात सोमवार दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व कर्मचारी संघटना व निवृत्तीवेतनधारक संघटनांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन कोषागार अधिकारी, श्रीमती आरती नांगरे यांनी केले आहे.

तसेच सेवानिवृत्ती होणा-या कर्मचा-यांचे बाबतीत त्यांचे निवृत्तीवेतन प्रकरण सुलभतेने महालेखापाल कार्यालयास सादर होण्यासाठी वित्त विभाग १५ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाने विकसित केलेल्या नमुना 5-अ बाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच ज्या निवृत्तीवेतनधारकांना महा उपलब्धी ॲप वापरताना काही अडचणी येत असतील तर त्यांचे निराकरणही त्याचदिवशी अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा) प्रविण पाटील व त्यांचे सहकारी करणार आहेत.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!