फलटण टुडे वृत्तसेवा (साखरवाडी दि २८ ऑक्टोबर २०२६):-
ऐतिहासिक काळापासून साखरवाडी – पिंपळवाडी परिसर हा कुस्ती, कबड्डी, खो-खो यांसारख्या विविध ग्रामीण खेळांची ‘पंढरी’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्र व देशात ओळखला जात होता. एकेकाळी क्रीडाविश्वात दबदबा असलेला हा परिसर मध्यंतरीच्या काळात अर्थकारण आणि व्यवसायामधील व्यस्ततेमुळे क्रीडा क्षेत्रापासून काहीसा दुरावला होता आणि खेळाची ही जुनी परंपरा खंडित झाली होती. हे चित्र बदलण्यासाठी आणि गावाचे क्रीडावैभव पुन्हा परत आणण्यासाठी पै. रवींद्र पवार, पै. माऊली गायकवाड आणि पै. चिमणराव भोसले यांनी पुढाकार घेतला. यांच्याच सुपीक कल्पनेतून मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पै. संजय रूपनवर यांच्या ‘स्वराज्य’ बंगल्यावर वस्ताद व पैलवानांचा एक ऐतिहासिक मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला.
या मेळाव्याला साखरवाडी- पिंपळवाडी पंचक्रोशीतील आजी-माजी नामवंत वस्ताद आणि पैलवानांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. यावेळी हनुमंत चव्हाण, आप्पा चव्हाण ,राजेंद्र जाधव, संतोष जाधव, विलास भोसले, संतोष भोसले, दौलत भोसले, विजय भोसले, बुटासिंग बोडरे, बाळासो भोसले, विष्णू भगत, सुदाम ननवरे, अरुण इंगळे ,संदीप पवार , फिरोज इनामदार, संग्राम पवार, राजेंद्र पवार , विराज भोसले ,दत्ता मोरे ,भगवान भोसले, कैलास भोसले ,पप्पू चाबुकस्वार, समीर सय्यद , दत्तात्रय भगत, शुभम भोसले, नंट्या येळे.

कार्यक्रमाची सुरुवात सर्व पैलवानांचे दैवत व शक्तीची देवता प्रभू श्री रामचंद्र आणि भक्त बजरंग बली यांच्या पूजन व विजय घोषणांनी करण्यात आली. प्रास्ताविकानंतर उपस्थित ज्येष्ठ वस्तादांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यामध्ये वयाच्या ८० ते ८५ वर्षांतील भीमराव खोमणे, गोकुळ खोमणे, निवृत्ती भोसले, निवृत्ती जाधव आणि कुंडलिक भोसले या ज्येष्ठ वस्तादांचा फेटा, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
या बैठकीत पैलवानांच्या मनोगत सत्रात निवृत्ती जाधव, कुंडलिक भोसले, समीर भोसले, अण्णा धुमाळ, महेश भोसले, शशिकांत कांबळे आणि संकेत चव्हाण यांनी आपल्या जुन्या ऐतिहासिक कुस्त्यांचे प्रसंग व क्रीडाजीवनातील अनुभव उपस्थितांसमोर कथन केले.

साखरवाडी-पिंपळवाडीची कुस्तीची ही गौरवशाली परंपरा पुन्हा नव्या उमेदीने सुरू करण्यासाठी श्री दत्त इंडिया साखर कारखाना, साखरवाडी यांना विनंती करून जुनी तालीम पुन्हा ताब्यात घेणे, आधुनिक पैलवानांना घडवणे, कुस्ती मार्गदर्शनासाठी अनुभवी पैलवानांनी आपला वेळ देणे आणि कोणत्याही प्रकारचे राजकारण, समाजकारण, धर्मकारण किंवा अर्थकारणाचा भेदभाव न करता खेळाचा विकास करणे यावर सखोल चर्चा झाली. तसेच गावातील कुस्ती आखाडा अधिक सक्षम करून सर्व कुस्त्यांचे नामांकित व नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पै तुषार मोहिते यांनी केले, प्रास्ताविक पै रमेश भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन पै तुकाराम पवार महाराज यांनी केले.


