जनहित प्रतिष्ठानच्या विद्यार्थी व शिक्षकांनी सर केले महाराष्ट्राचे सर्वोच्च कळसुबाई शिखर

कळसूबाई शिखर सर केलेले जनहित प्रतिष्ठानचे शिबीर प्रमुखसचिन नाळे, मुख्याध्यापक अतुल कुटे, विद्यार्थी व शिक्षक

 
फलटण टुडे (बारामती ):-
बारामती येथील जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील इ.७ वी व ८ वी च्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक यांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई (उंची १६४६ मिटर) एकमेकांना साथ देत पार केले. या वर्गाचे मुतखेल (भंडारदरा) या गावातील आश्रमशाळेत आठ दिवसाचे मातृभूमी परिचय शिबीर आयोजित करण्यात आले होते. याच शिबिराचा एक भाग म्हणजे ‘स्थळभेट’ अंतर्गत या शिबीरातील ३९ विद्यार्थी व ८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अकोले येथील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई चढून पार करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. याच माध्यमातून विद्यालयाने पुस्तकी ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना दिला.

     सकाळी लवकर बारी या गावात नाष्टा करून ट्रेकिंगला उत्साहात सुरुवात झाली. वन विभागाने बसविलेल्या लोखंडी शिड्यांचा आधार घेत, एकमेकांना साथ देत सर्वजण कळसुबाई शिखरावर पोहचले. तेथे कळसुआई देवीला आणि निसर्गाला सर्वजण नतमस्तक झाले. महाराष्ट्रातील उंच ठिकाणी पोहोचून सर्वजण आनंदून गेले. छत्रपती शिवरायांचा जयघोष या ठिकाणी करण्यात आला. या उपक्रमातून पंचकोश विकसन होण्यास नक्कीच मदत होईल.

 

   शिबीर प्रमुख म्हणून  सचिन नाळे, प्रशालेचे मुख्याध्यापक अतुल कुटे, निलेश भोंडवे, विपुल देशपांडे, सौ.सोनाली खटके, सौ.पद्मजा पळसे, दिप्ती पेटकर, श्रीमती.सिमा दळवी, यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर यशस्वी पार पडले. तसेच भंडारदरा येथील रविंद वैराट, राजाभाऊ खाडे, मोहन खाडे, महाराष्ट्र पोलीस योगेश राऊत, मुतखेल आश्रमशाळा मुख्याध्यापक सुतार सर व त्यांचे सहकारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

       या कामगिरीबद्दल विद्यालयाचे अध्यक्ष किशोर कानिटकर, उपाध्यक्ष सतिश गायकवाड,सचिव रविंद्र शिराळकर, खजिनदार सतिश धोकटे, सर्व संचालक, आचार्य हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक अतुल कुटे, बालभवन प्रमुख – सौ.स्नेहल भिडे व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवरांनीं  अभिनंदन 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!