गोखळी ( फलटण टुडे प्रतिनिधी): –
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना दैनंदिनी व्यवहाराची जाणीव आणि पैशांची आकडेमोड यावी या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगतापवस्ती (गोखळी) गोखळी ता.फलटण येथे विद्यार्थ्यांसाठी आठवडा बाजार आणि खाऊ गल्ली या उपक्रमाचे आयोजन केले होते .
दैनंदिन जीवनातील व्यवहार ज्ञान समय सूचकता व हजर जबाबीपणा अशा विविध महत्त्वाच्या मूल्यांचा अंतर्भाव विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सहज समाविष्ट होण्यासाठी शाळेत आठवडे बाजार आणि खाऊ गल्लीचे आयोजन करण्यात आले होते. विविध प्रकारची स्टॉल उभारणीपासून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या दुकानाची योग्य मांडणी विंचू की व्यवहार कसा करावा आपल्या मूळ भांडवल व खर्चाचा ताळमेळ घालून फायदा तोटा असा लक्षात घेणे बाजारात होणाऱ्या काही फसवणुकीपासून सावध होणे आधी बाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आठवडा बाजाराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते.मा. उपसरपंच श्री.राधेश्याम जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
जगतापवस्ती (गोखळी) येथे पहिली ते पाचवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे यातील विद्यार्थ्यांनी १८ स्टॉल लावले होते. या आठवडा बाजारांना महिला व पुरुषांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पवारवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ सुनंदा बागडे यांनी आठवडा बाजाराला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी माजी सरपंच बाळासाहेब जगताप ,माजी ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर जगताप, वसंत जगताप, पोलीस पाटील विकास शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जगताप, महेंद्र गावडे, दत्तात्रय जगताप( फौजी), तानाजी जगताप ,शालेय कमिटी व्यवस्थापन समिती अध्यक्ष मयूर आढाव ,उपाध्यक्ष सोमनाथ ढोबळे ,अजित गावडे, युवराज जगताप, राहुल तरुण मंडळ जगतापवस्ती.महिला व पुरुष उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांचे स्वागत जमीर पठाण सर यांनी केले व आभार व बापूराव शिंदे सर यांनी मानले