नॅशनल ऍग्री इनपुट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ची स्थापना

बारामती : 
 शेती क्षेत्रामध्ये संशोधन व विकास आणि  संशोधन  करणे,  शेतकऱ्यांमध्ये शेती विषयक जनजागृती करणे, उत्पादकांच्या मूलभूत गरजा समजून त्यावर तोडगा काढणे, उत्पादनामध्ये एकता निर्माण करून अन्याय दूर करण्यासाठी संघटन करणे,  युवा उद्योजकांचे लायसन्स काढण्यासाठी सहकार्य करणे व भारतभर शेती क्षेत्रामध्ये युवा उद्योजक निर्माण करण्यासाठी कार्यरत राहणे आदी उद्दिष्ट्ये घेऊन 
बारामती मध्ये ऍग्री  उत्पादक यांची
नॅशनल ऍग्री  इनपुट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ची स्थापना  करण्यात आली. 
मंगळवार दि.29 नोव्हेंबर रोजी  सदर असोसिएशन ची स्थापना करून उदघाटन कृषी विभागाचे  राज्याचे गुणवत्ता नियंत्रण अधिकारी किरण जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले 
या प्रसंगी  उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, असोसिएशन चे अध्यक्ष अजित सस्ते, सचिव नितीन आटोळे, खजिनदार रामदास चव्हाण, संचालक  देविदास गावडे, सागर भरणे, नवनाथ हगारे, दादासो करे, कुमार काकडे, सतीश पानसरे, निलेश खोमणे,  निलेश बांदल, हनुमंत चव्हाण, अमित  जगताप, कैलास नाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड तालुक्यातील ऍग्रो कंपनी चे संचालक उपस्तित होते. 
उदघाटन निमीत्त पी एन एस फौंडेशन व राम ऍग्रो टेक ग्रुप व संघटनेच्या वतीने  रक्तदान शिबीर चे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी स्वागत चेअरमन अजित सस्ते यांनी केले व आभार सचिव नितीन आटोळे यांनी मानले
फोटो ओळ : उदघाटन करत असताना किरण जाधव व रविराज सस्ते आणि इतर
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!