बारामती : राज्याचे
माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून – बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने बारामती ग्रामीण भागात व शहरातील सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत दर्जेदार वीस हजार (20000) वह्या मोफत उपलब्ध करून देऊन अजितदादांना अभिप्रेत असा आदर्श सामाजिक उपक्रम राबवून कौतुकास्पद कार्य केले आहे असे गौरवोदगार बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सौ सुनेत्रा पवार यांनी काढले.
शारदा प्रांगण येथील नगर परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप सौ सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, बारामती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, वनिता बनकर, सुरेंद्र भोईटे, बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, मनोज पोतेकर, संभाजी माने, मनोहर गावडे, अंबिरशाह शेख, उद्योजक राजकुमार दोशी, नितीन जामदार तसेच शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.