महात्मा जोतीराव फुले यांच्या १९६ व्या जयंतीनिमित्त आदर्श बहुजन शिक्षक संघ (IBTA) कडून अभिवादन

फलटण दि. ११ (फलटण टुडे ) :

सोमवार दिनांक ११ एप्रिल २०२२ रोजी ज्या महापुरुषाने शिक्षणाची ज्ञानगंगा सर्वसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या दारापर्यंत पोहचवुन मानवतेचा संदेश देऊन माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला ते क्रांती सूर्य,थोर समाजसुधारक,स्त्री शिक्षणाचे प्रणेते,शिवजयंतीचे जनक, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या १९६ व्या जयंतीनिमित्त आदर्श बहुजन शिक्षक संघ (IBTA) महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या ध्येय धोरणानुसार राष्ट्रीय महापुरूषांच्या जयंती सण म्हणून साजरा करण्यात यावा या उद्देशाने फलटण तालुका आदर्श बहुजन शिक्षक संघ (IBTA) महाराष्ट्र राज्य फलटण शाखेच्या वतीने फलटण तालुका आदर्श बहुजन शिक्षक संघ (IBTA) महाराष्ट्र राज्य संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र अहिवळे सर यांच्या निवासस्थानी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले*
*या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चौधरवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम कोकाटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य संघटनेचे नेते,मिंडवस्ती शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक लक्ष्मण गुंजवटे सर, पोपट अहिवळे (आप्पा),सौ.सावित्रा अहिवळे, मारूती ढगे सर, राज्य उपाध्यक्ष राजेश बोराटे सर, जिल्हा अध्यक्ष गणपत बनसोडे सर, जिल्हा कोषाध्यक्ष नितीन नाळे सर, जिल्हा कार्याध्यक्ष बिपिन जगताप सर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश नाळे सर, आबासाहेब नाळे सर, आकाश मोरे सर,अमित मणेर सर, तालुका अध्यक्ष जयवंत तांबे सर, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र कर्णे सर, तालुका कोषाध्यक्ष विकास सोनवणे सर, तालुका सरचिटणीस राजेंद्र अहिवळे सर,सौ.रेखा अहिवळे मॅडम,सौ.लता बोराटे मॅडम,सौ.स्वाती काकडे मॅडम,सौ.तेजस्विनी काकडे,कु.श्रावस्ती अहिवळे, गणेश मुळीक, इम्तियाज नदाफ, ओंकार गायकवाड, सचिन गायकवाड, इत्यादी उपस्थित होते*
*सर्वप्रथम क्रांती सूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करणेत आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चौधरवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम कोकाटे यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेल्या उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्याचा आसूड हे महात्मा जोतीराव फुले यांची पुस्तिका देऊन विशेष सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे पोपटराव अहिवळे (आप्पा) व त्यांच्या पत्नी सौ.सावित्रा अहिवळे यांचा आदर्श माता पिता म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी गणपत बनसोडे सर, जयवंत तांबे सर, विकास सोनवणे सर, राजेंद्र कर्णे सर, आबासाहेब नाळे सर यांनी क्रांती सूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवन कार्यावर आपले विचार मांडले*
*यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तुकाराम कोकाटे साहेब यांनी महात्मा फुले यांचे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले व त्यांनी चौधरवाडी शाळेसाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली*
*कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण गुंजवटे सर यांनी संघटनेचे विचार व महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्याचा गौरव आपल्या भाषणात केला*
   *प्रास्ताविक व सुत्रसंचलन राजेंद्र अहिवळे सर आणि आभार राजेश बोराटे सर यांनी मांडले*
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!