बारामती: बारामती शहरातील देसाई इस्टेट परिसरातून राष्ट्रवादी शहर च्या (फादर बॉडी) उपाध्यक्ष पदी जळोची चे माजी सरपंच छगन आटोळे तर राष्ट्रवादी युवक च्या उपाध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते संग्राम खंडागळे यांची निवड करण्यात आली आहे. या पूर्वी आटोळे व खंडागळे यांनी नगरसेवक अतुल बालगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा,लोकसभा,नगरपरिषद निवडणूक च्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाचे केलेले उल्लेखनीय कार्य आणि कोरोना च्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोफत मास्क,सॅनिटायझर,भाजीपाला, किराणा साहित्य वाटप आणि कोरोना योध्याचा सत्कार आदी कामे केली आहेत या सर्वांची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार आटोळे व खंडागळे यांना संधी देण्यात आली आहे. निवडीचे पत्र शहर राष्ट्रवादी चे अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर,युवक चे अध्यक्ष नगरसेवक अमरजी धुमाळ यांच्या हस्ते देण्यात आले या प्रसंगी
स्थानिक नगरसेवक अतुलजी बालगुडे,राहुल वायसे, अमोल पवार,निलेश पवार,सोहेल शेख,सुरज शिंदे,तोहीत शेख न्यू युवा शिवक्रांती प्रतिष्ठान चे अध्यक्ष हेमंत नवसारे आदी मान्यवर उपस्तीत होते. “राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना सर्व सामान्य नागरिकां पर्यंत पोहचविणे व पक्षांनी दिलेली जवाबदारी प्रामाणिक पणे पार पाडू असे निवडीनंतर छगन आटोळे व संग्राम खंडागळे यांनी सांगितले.