अनोंदणीकृत उद्योजकांसाठी महास्वयंम वेबपोर्टलवर अर्जंट मॅन पॉवरची सुविधा

 सातारा, दि. 18(जिमाका) : सातारा जिल्ह्यातील ज्या उद्योजकांनी महास्वयंम बेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही परंतु त्यांना तातडीच्या मनुष्यबळाची गरज आहे, अशा उद्योजकांना वेबपोर्टलवर नोंदणी न करता त्यांचेकडे असलेली रिक्तपदे अधिसूचित करण्याची सुविधा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत महास्वयंम  या वेबपोर्टलवर अर्जंट मॅन पॉवर नावाची नवीन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

अनोंदणीकृत उद्योजकांनी महास्वयंम https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अर्जंट मॅन पॉवर  या मेनुवर क्लिक करुन  पेजवरील माहिती कंपनीची माहिती भरावी. भरलेल्या माहितीच्या आधारे मोबाईलवर आलेल्या ओटीपीचा वापर करावा. ३० मिनिटात उद्योजकाच्या ई-मेल वर उमेदवारांच्या यादीची लिंक प्राप्त होईल. त्या लिंकद्वारे उद्योजकांस उमेदवारांची यादी प्राप्त  होईल. महास्वयंम वेबपोर्टलवर सर्व सुविधा उद्योजकांसाठी मोफत आहे.  या सुविधेच्या अधिक  माहितीसाठी अथवा काही अडचण असल्यास ०२१६२-२३९९३८ या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे  आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग सातारचे सहायक आयुक्त  सचिन जाधव यांनी केले आहे

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!