बारामती:
बारामती नगरपरिषद च्या आव्हानास प्रतिसाद देत नागरिकांनी कृत्रिम जलकुंड मध्ये गणेश विसर्जन करीत अनंत चतुर्थी साजरी केली.
शहरातील नीरा डावा कालवयाची दुरुस्ती व कऱ्हा नदीचे सुशोभीकरण करण्याचे काम चालू असल्याने या वर्षी त्या ठिकाणी श्री गणेश मूर्ती चे विसर्जन करता येत नसल्याने
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न जमवता गणेश विसर्जन मिरवणूक न काढता श्री गणेश मूर्ती चे विसर्जन कृत्रिम जलकुंडा मध्ये करण्या साठी शहरातील विविध भागात कृत्रिम जलकुंड ठेवण्यात आले होते.या मध्ये अनेक नागरिकांनी स्वयं स्फूर्तीने गणेश मूर्तीचे विसर्जन केले.त्याच प्रमाणे निर्माल्य विसर्जन साठी सुद्धा वेगळी उपयोजना करण्यात आली होती सकाळी 8 वाजल्या पासून ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत नागरिकांनी प्रतिसाद दिला प्रत्येक जलकुंड बरोबर नगरपरिषद चे अधिकारी,कर्मचारी व पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
बारामती शहरा बरोबर बारामती एमआयडीसी परिसरात सुद्धा नागरिकांनी व विविध कंपन्यांनी कृत्रिम जलकुंड मध्ये गणेश मूर्ती विसर्जन केले.