सातारा, दि. 25 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या अपंग कल्याण आयुक्तालय, पुणे अंतर्गत (अस्थिव्यंग) बालकांसाठी मोफत शिक्षण, वसतीगृह व गरजेनुसार अस्थिव्यंगोपचार शस्त्रक्रिया व कृत्रिम अवयव पुरवण्याच्या सुविधा पुरविणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय निवासी संस्था किल्ला भाग मिरज येथे कार्यरत असून या संस्थेत 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे तर इच्छुकांनी अधिक्षक शासकीय अपंग बालगृह व शाळा, किल्ला भाग, बी.एस.एन.एल. ऑफीस शेजारी मिरज येथे किंवा 9325555981, 9860642680, 9422216459, 9130448195 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.