फलटण : शहरातील मंगळवार पेठ, रविवार पेठ, सोमवार पेठ या भागांमध्ये करोनाचा शिरकाव झाल्यामुळे हा संपूर्ण भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे तरी या भागातील नागरिकांचे सर्व आर्थिक नियोजन विविध व्यवसाय वरती आधारित असून कंटेनमेंट झोन मुळे या भागातील लोकांना बाहेर जाता येत नाही त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून या भागातील लोकांना आर्थिक अडचण जाणवत आहे. तरी प्रशासनाने या भागातील गरजू लोकांना अन्न पाकीट सुरू करावे असे मा. नगरसेवक दत्ता अहिवळे यांनी प्रशासनाला विनंतीं करण्यात आली आहे
मंगळवार पेठ, रविवार पेठ व सोमवार पेठ केरोनाच्या भयानक सावटीखाली असून तिन्ही पेठेतील गरीबांमध्ये उपासमारीची भीती जाणवत आहे तरी याभागात अन्नपाकिट पुन्हा सुरू करावे असे या भागातील नारिकांना वाटतआहे
आधीच गरीबी त्यात अडीच महिन्याचा लाॅकडाऊन त्यामुळे बचत सगळी संपली आहे.आता अनलाॅक सुरू झाला पण तिन्ही पेठेत केरोनाने शिरकाव केला आणि एक भयानक विस्फोट झाल्यावर जी आवस्था होते तशी स्थिती या तिन्ही पेठेतील लोकांची झाली आहे. आधीच गरीबी त्यात पुन्हा हे परिसर लाॅक करण्यात आले. भाजीपाला वाहतूक,विक्रीला, रोजगाराला कशीतरी सुरूवात झाली होती. त्यांना आता मनाई करण्यात आली आहे. जे धुणे-भांडी घरगुती स्वच्छतेसाठी जात होते ते बंद झाले.जे विविध ठिकाणी कामावर जात होते.त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.सारा फलटण अनलाॅक पण मंगळवार पेठ, सोमवार पेठ, लाॅकडाऊन. आता याभागातील लोकांची मोठ्या प्रमाणात उपासमार होणार आहे.त्यामुळे शासन, प्रशासनाने याकडे बारकाईने लक्ष द्यावे. व याभागातील सर्व गरीबांसाठी १०/१० कुटुंबाच्या गटासाठी अन्न पाकीटांची व्यवस्था करावी.
PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
Email – [email protected]
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!