फलटण(विक्रम चोरमले) :- ‘रोगा पेक्षा ईलाज भयंकर’ अशी म्हणण्याची वेळ फलटणकरांवर आली आहे. फलटण शहरालगत कोरोना रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाकडून कंटेनमेंट झोन व बफर क्षेत्र घोषित तर करण्यात आले परंतु या झोनमध्ये कोणकोणत्या सेवा सुरू राहणार किती दिवस राहणार नागरिकांना सेवा कश्या व कुठे मिळणार याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाकडून मिळाली नसल्याने नागरिकांन मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
झोन बाबत फलटणकरांमध्ये संभ्रम अवस्था..
बिरदेवनगर जाधववाडी येथील एक आरोग्य सेविका फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत आरोग्य सेवेत काम करीत होती या आरोग्य सेविकेचा कोरोना अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर या रुग्णास पुढील उपचारासाठी सिव्हील हाॅस्पीटल, सातारा येथे पाठवण्यात आले. पाॅसिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कातील निकट व दूरस्थरीत्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी तयार करण्यात आली आहे. निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले व संस्थात्मक विलगीकरण करण्याची कार्यवाही करण्यात आली. यानंतर लगेचच फलटण शहर व जाधववाडी ग्रामपंचायत येथील सुरू असणारी दुकाने बंद करण्यात आली. जाधववाडी व फलटण शहर तसेच लगतचा कंटेनमेंट झोन व बफर झोन जाहीर करत रस्ते ही बंद करण्यात आली.गुरुवारी फलटण शहर व जाधववाडी भागात शुकशुकाट होता नागरिकांनी स्वतःहून घरातून बाहेर येणे टाळले.
बुधवार व गुरुवार या दोन दिवसात प्रशासनाकडून कंटेनमेंट झोन व बफर क्षेत्र झोनमध्ये कोणकोणत्या सेवा सुरू राहणार किती दिवस झोन राहणार नागरिकांना सेवा कश्या व कुठे मिळणार याबाबत सविस्तर माहिती मिळाली नसल्याने नागरिकांन मध्ये नाराजी आहे.
नर्सिंग होम, हॉस्पिटल, दवाखाने, मेडिकल, किराणा दुकान, भाजीपाला सुरू राहणार की नाही ही राहणार नसेल किती दिवस सुरू राहणार नाही.फलटणकरांना किराणा, औषधे, दूध घरपोच पुरवले जाणार का पुरवला घरपोच पुरवला जाणार असेल तर तो कसा कोणाकडून पुरवला जाणार कंटेनमेंट झोन जाधववाडी हद्दीमधील बिरदेवनगर, फलटण शहर हद्दीतील संजीवराजेनगर, भडकमकरनगर व बफर झोन मधील फलटण शहर, कोळकी, ठाकुरकी मधील नागरिकांना पडला आहे.
उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी फक्त कागदावरच आदेश काढला असून गुरुवारी दिवसभर कोणत्याही प्रकारची सूचना व माहिती कंटेनमेंट झोन व बफर क्षेत्र मधील नागरिकांना मिळाली नसल्याने प्रशासनावर नागरिकांनी चांगलीच आगपाखड केली. लवकरात लवकर उपविभागीय अधिकारी व स्थानिक प्रशासन यांच्याकडून कोणत्याही प्रकारची सूचना व माहिती न मिळाल्यास तसेच सेवा बाबत उपाययोजना न झाल्यास कंटेनमेंट झोन व बफर क्षेत्र झोनमधील नागरिक अत्यावश्यक सेवेच्या खरेदीसाठी बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. फलटण शहर व जाधववाडी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर उपयोजना करण्यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांना सूचना व मार्गदर्शन करणे गरजेचे आहे अन्यथा पुन्हा पहिल्यासारखे दिवस येऊ शकतात व पर्याय उपलब्ध नसल्याने अत्यावश्यक सेवा प्राप्त करण्यासाठी नागरिक रस्त्यावर प्रचंड गर्दी करू शकतात याचे भान प्रशासनाने ठेवण्याची गरज आहे.