फलटण :- फलटण तालुक्यात विनापरवाना अनधिकृतपणे केबलचे जाळे पसरले असून महावितरणच्या वीज वाहिनीवरून केबल टाकताना झालेल्या अपघातात एक युवक जखमी झाला असून याप्रकरणी केबल चालक व त्यांच्या कामगारा विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण येथे दि १ रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास स्वामी विवेकानंद नगर येथील महावितरणच्या २२ केव्ही वीज वितरण वाहिनीवरून खाजगी केबल चालक अनिल आस्वानी रा . स्वामी विवेकानंदनगर . फलटण व त्याचा अज्ञात कामगार ( नाव पत्ता माहीत नाही ) हे दोघे २२ केव्ही उच्चदाब वाहीनीवरुन विनापरवाना त्यांची खाजगी केबलची वायर टाकत असताना ती तारेसह असणारी केबल तुटुन रोडवरून जाणाऱ्या एका युवकास विजेचा धक्का लागला आहे. यात सदरचा युवक जखमी झाला यानंतर त्या युवकास तेथील काही नागरिकांनी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.
या घटनेबाबत नागरिकांनी महावितरण कार्यालयास अवगत केले असता त्यांनी घटनास्थळी येऊन वीज पुरवठा पूर्ववत केला व त्या ठिकाणी पडलेल्या तारा बाजूला केल्या व याबाबत सहाय्यक अभियंता महावितरण फलटण शरद पंढरीनाथ येळे यांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर माहिती घेऊन फलटण शहर पोलीस ठाणेत फिर्याद दाखल केली. केबल चालक अनिल आस्वानी यांने शहरात अनेक ठिकाणी अशाच विनापरवाना केबल टाकल्या असल्याचेही फिर्यादीत म्हंटले आहे. सहाय्यक अभियंता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल आस्वानी रा . स्वामी विवेकानंदनगर व त्याचा अज्ञात कामगार ( नाव पत्ता माहीत नाही ) याचेविरुध्द भारतीय विद्युत अधिनियमन २००३ कायदा कलम १३९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळी रस्त्यावर शॉर्ट सर्किटमुळे जळून तुकडेहुन पडलेल्या केब